AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कारणामुळे दिग्दर्शक रिया चक्रवर्ती हिला घाबरतात, थेट अत्यंत मोठा खुलासा

रिया चक्रवर्ती हे नाव सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर प्रचंड चर्चेत आले. रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूत याला डेट करत होती. अभिनेत्याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक गंभीर आरोप हे करण्यात आले. इतकेच नाही तर थेट तिला जेलमध्ये राहण्याची देखील वेळ आली.

'या' कारणामुळे दिग्दर्शक रिया चक्रवर्ती हिला घाबरतात, थेट अत्यंत मोठा खुलासा
| Updated on: Nov 15, 2023 | 2:45 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर धक्कादायक खुलासे झाले. इतकेच नाही तर बाॅलिवूडमधील काळे सत्य जगासमोर आले. सुशांतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड आणि बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर अत्यंत गभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर तिला काही दिवस थेट जेलमध्ये राहण्याची देखील वेळ आली. आता नुकताच रिया चक्रवर्ती हिने काही मोठे खुलासे केले. रिया चक्रवर्ती हिने थेट सांगितले की, सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर दिग्दर्शक तिला चित्रपटामध्ये घेण्यासही घाबरत होते.

एकप्रकारे तिला बाॅलिवूडमधून बाहेरचा रस्ताच दाखवण्यात आला. रिया चक्रवर्ती हिच्यावर थेट सुशांत सिंह राजपूत याला बळजबरी ड्रग्स देण्याचे आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर सुशांत सिंहला देण्यात येणारे ड्रग्स हे तिचा भाऊ पुरवत होता, असाही आरोप आहे. याच ड्रग्सच्या प्रकरणात तिला आणि तिच्या भावाला जेलमध्ये राहण्याची वेळ आली.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये रिया चक्रवर्ती हिने यावरच भाष्य केले. रिया चक्रवर्ती म्हणाली की, 2020 हे वर्षे माझ्यासाठी पार कठीण राहिले. मला चित्रपटांमध्ये कोणीही काम देत नव्हते. दिग्दर्शक मला काम देण्यास घाबरत होते. लोक मला चित्रपट आॅफर करण्यासही घाबरत होते. मी आता फक्त हेच विचार करते की, सर्वकाही ठीक होईल.

हे नक्कीच आहे की, अगोदरपेक्षा आता काही गोष्टींमध्ये सुधारणा ही नक्कीच आहे. नेटकरी आता मला टार्गेट करत नाहीत. हळूहळू सर्वकाही व्यवस्थित होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्ती हिने थेट म्हटले होते की, आत्महत्या आणि ड्रग्स या गोष्टींवर बोलून तिला कंटाळा आलाय. सुशांत सिंह याच्या निधनानंतर लोकांनी तिला मोठ्या प्रमाणात टार्गेट केले होते. एका मुलाखतीमध्ये रिया चक्रवर्ती हिने थेट जेलमध्ये राहण्याचा तिचा अनुभव देखील सांगितला होता.

सध्या रिया चक्रवर्ती ही तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चांगलीच चर्चेत आहे. काही जुन्या गोष्टी विसरून रिया चक्रवर्ती ही पुन्हा एकदा प्रेमात पडल्याचे सांगितले जाते. एका मोठ्या व्यवसायिकाला रिया चक्रवर्ती ही डेट करत आहे. विशेष म्हणजे तो व्यवसायिक आज कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. नेहमीच रिया चक्रवर्ती हिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. सोशल मीडियावरही रिया चक्रवर्ती सक्रिय दिसत आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.