Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!

Rhea Chakraborty | सुशांतच्या मृत्युनंतर रिया चक्रवर्तीने धरलाय ‘या’ अभिनेत्याचा हात, एकत्र एन्जॉय करतायत पार्टी!
रिया चक्रवर्ती

आता रिया हळूहळू आपले जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता अलीकडेचा रिया अभिनेता साकीब सलीम (saqib saleem) सोबत दिसली होती. दोघेही अलिबागहून पार्टी करून येत होते.

Harshada Bhirvandekar

|

Apr 10, 2021 | 12:45 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिचे नाव खूप चर्चेत होते. अभिनेत्याच्या मृत्यूनंतरच रियानेच या गोष्टीची पुष्टी केली होती की, ती सुशांतची गर्लफ्रेंड आहे. मात्र, त्यानंतर रियाला सुशांतच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियावर बरेच आरोप केले होते (Rhea Chakraborty spotted with actor saqib saleem).

यानंतर ड्रग्स प्रकरणात रियाला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर लोकांमध्ये तिच्याबद्दल बर्‍याच नकारात्मक गोष्टी पसरल्या. तथापि, आता रिया हळूहळू आपले जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता अलीकडेचा रिया अभिनेता साकीब सलीम (saqib saleem) सोबत दिसली होती. दोघेही अलिबागहून पार्टी करून येत होते.

यादरम्यान हे दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. रियाने प्लेन टी शर्ट आणि जीन्स परिधान केले होते, तर साकीबने शर्ट व पँट परिधान केली होती. दोघेही मीडियासमोर उभे राहिले नाहीत आणि तेथून थेट निघून गेले. असे म्हटले जात आहे की, रियाने साकीबचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा केला आहे आणि यावेळी मनीष मल्होत्रा ​​देखील त्यांच्यासोबत होता.

पाहा रिया चक्रवर्ती आणि साकीब सलीमचे फोटो

प्रेमावर विश्वास आहे!

काही दिवसांपूर्वी रियाने एक फोटो शेअर केला आणि प्रेमाबद्दल काही गोष्टी लिहिल्या होत्या. तिने एका मैत्रिणीबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये दोघींनी हाताने हार्ट तयार केले होते. हा फोटो शेअर करताना रियानेही लिहिलं, ‘प्रेम म्हणजे ताकद … प्रेम म्हणजे एक कपडा ज्याचा रंग कधीच हलका होत नसतो. कितीही धुतले तरी फरक पडत नाही.’(Rhea Chakraborty spotted with actor saqib saleem)

‘चेहरे’मध्ये झळकणार!

सुशांतच्या निधनानंतर आता रिया ‘चेहरे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमधून रियाला दूर ठेवण्यात आले होते. मात्र, रिया या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसली होती. तिला मोठ्या पडद्यावर पाहून रियाचे चाहते देखील उत्साही झाले आहेत.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी केले मोठे विधान

दुसरीकडे ‘चेहरे’चे निर्माते आनंद पंडित यांनी रियाविषयी मोठे विधान केले. पोस्टर आणि टीझरमधून तुम्ही रियाला का हटवले, असे जेव्हा त्यांना विचारले गेले तेव्हा ते म्हणाले, या चित्रपटाचे मुख्य कलाकार अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी आहेत, त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष त्यांच्याकडे आहे. मी चित्रपटातील तरुण कलाकारांना नव्हे तर, मुख्य कलाकारांना प्रोत्साहन देईन.

तथापि, नंतर त्याने आपले बोलणे सांभाळले आणि म्हटले की त्याने हे सर्व रियासाठी केले, कारण त्याच्या फिल्म किंवा कोणत्याही प्रोजेक्टमुळे रियाचे नुकसान होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. या मुद्यावर आपण रियाशी आधीच बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.

(Rhea Chakraborty spotted with actor saqib saleem)

हेही वाचा :

Ira Khan | बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत आमीरची लेक म्हणतेय, ‘लॉकडाऊनसाठी तयार आहोत!’

Video| कंगना रनौत-तापसी पन्नूची दिलजमाई? पुरस्कार सोहळ्यात तापसीकडून कंगनाची स्तुती!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें