Rhea Chakraborty | ‘चेहरे’मध्ये रिया चक्रवर्ती दिसणार की नाही? निर्मात्याने दिले ‘हे’ उत्तर!

अलीकडेच, अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टाररचा 'चेहरे'चे अनेक पोस्टर प्रसिद्ध झाले. मात्र, यापैकी कोणत्याही पोस्टरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली नाही.

Rhea Chakraborty | ‘चेहरे’मध्ये रिया चक्रवर्ती दिसणार की नाही? निर्मात्याने दिले ‘हे’ उत्तर!
रिया चक्रवर्ती

मुंबई : गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्युनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिची खूप चर्चा झाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांनी अनेक आरोप केले होते. त्यानंतर तिची चौकशी केली गेली, तिला ट्रोलही केले गेले, अगदी ड्रग्ज विक्रीसाठी तिला तुरूंगाची हवा देखील खावी लागली. रिया चक्रवर्ती आता जामिनावर तुरुंगातून बाहेर आली आहे. पण, आता पुन्हा एकदा तिच्या आगामी ‘चेहरे’ (Chehre)  चित्रपटामुळे ती चर्चेत आली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमधून रियाचा चेहरा मात्र गायब आहे. त्यामुळे या चित्रपटात रिया दिसणार की नाही?, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे (Chehre film Producer Anand Pandit reaction on Rhea Chakraborty presence in movie).

पोस्टर्स आणि जाहिरातींमधून रिया गायब

अलीकडेच, अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी स्टाररचा ‘चेहरे’चे अनेक पोस्टर प्रसिद्ध झाले. मात्र, यापैकी कोणत्याही पोस्टरमध्ये रिया चक्रवर्ती दिसली नाही. या चित्रपटाच्या प्रचार मोहिमेमधूनही रिया चक्रवर्ती हिचे नावही गायब आहे. तेव्हापासून रिया चक्रवर्ती या चित्रपटात आहे की नाही, याचा अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यावर आता उत्तर मिळाला आहे ते थेट चित्रपट निर्माता आनंद पंडित यांचे…

‘मिड डे’च्या वृत्तानुसार रियासंबंधित या प्रश्नावर निर्मात्याने उत्तर दिले. निर्माते आनंद पंडित यांना जेव्हा रियाबद्दल विचारले गेले, तेव्हा त्यांनी फिरवून-फिरवून त्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले की, जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच ते रिया चक्रवर्ती यांच्याबद्दल बोलतील. ते म्हणाले, ‘आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही अद्याप रिया चक्रवर्ती यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही, म्हणून मी या प्रश्नाचे उत्तर आता देणार नाही. आम्ही या प्रश्नाचे उत्तर योग्य वेळी देऊ. मी आत्ता याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही.'(Chehre film Producer Anand Pandit reaction on Rhea Chakraborty presence in movie)

चित्रपटावर होऊ शकतो परिणाम!

स्पॉटबॉयच्या अहवालानुसार, रिया आता जगासमोर यावी, अशी दिग्दर्शक रुमी जाफरेची इच्छा आहे. काही जण म्हणतायत की, ती सर्वांचा सामना करण्यास तयार आहे, तर उर्वरित लोक असे सांगत आहेत की, जर रिया प्रमोशनसाठी लोकांसमोर आली, तर तिला विचित्र प्रश्न विचारले जातील.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती ही चर्चेचा एक भाग बनली आहे. ड्रग्स प्रकरणात रियाला एनसीबीनेही अटक केली होती. 1 महिन्यांपर्यंत तुरूंगात राहिल्यानंतर रिया आता जामीनावर बाहेर आली आहे. रियाची प्रतिमा खराब झाल्यानंतर तिच्या प्रमोशनमध्ये सामील होणार की, नाही याविषयी चर्चा सुरू आहे. कारण, जर ती प्रमोशनचा भाग बनली तर, कदाचित त्याचा चित्रपटावरही परिणाम होऊ शकतो.

गूढ-थ्रिलर चित्रपट

‘चेहरे’ हा एक गूढ-थ्रिलर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन रूमी जाफरी यांनी केले आहे. या वर्षाचा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट म्हणून ‘चेहरे’चे नाव घेतले जात आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी व्यतिरिक्त अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, धृतिमान चक्रवर्ती, रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित याच्या मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड केली आहे. हा चित्रपट आता 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

(Chehre film Producer Anand Pandit reaction on Rhea Chakraborty presence in movie)

हेही वाचा :

Radhe vs SMJ 2 | जॉनच्या चित्रपटाची तारीख बदलली, आता ‘सत्यमेव जयेते 2’ थेट भाईजानच्या ‘राधे’ला टक्कर देणार!

Birthday Special | ‘ती’ घटना घडली नसती, तर आज अमिताभ बच्चनची लेकही असती बॉलिवूडमध्ये! वाचा श्वेता नंदाबद्दल…  

Published On - 1:02 pm, Wed, 17 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI