Radhe vs SMJ 2 | जॉनच्या चित्रपटाची तारीख बदलली, आता ‘सत्यमेव जयेते 2’ थेट भाईजानच्या ‘राधे’ला टक्कर देणार!

हा चित्रपट पहिल्यांदा ईदनंतर 14 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण, आता हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच थेट 13 मे रोजीच प्रदर्शित होणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:32 PM, 17 Mar 2021
Radhe vs SMJ 2 | जॉनच्या चित्रपटाची तारीख बदलली, आता ‘सत्यमेव जयेते 2’ थेट भाईजानच्या ‘राधे’ला टक्कर देणार!
सलमान आणि जॉन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (Actor John Abraham) लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ (Satyameva Jayate 2) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातून त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. मात्र, हा चित्रपट पहिल्यांदा ईदनंतर 14 मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण, आता हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच थेट 13 मे रोजीच प्रदर्शित होणार आहे (Bollywood Actor John Abraham starrer Satyameva Jayate 2 movie released date change).

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉनच्या ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटासह प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख एक दिवस पुढे ढकलली होती. मात्र, आता ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते 2’ एकाच दिवशी रिलीज होणार आहेत.

जॉन अब्राहमने आपल्या चित्रपटाशी संबंधित एक नवे पोस्टर सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या नवीन रिलीज तारखेशी संबंधित माहिती आहे. हे पोस्टर शेअर करताना जॉनने लिहिले की, ‘ईद पर सत्या बनाम जय लड़ेंगे इस साल, दोनों भारत मां के लाल!’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आपल्याला दोन जॉन अब्राहम दिसत आहेत. ज्यामुळे असे म्हटले जात आहे की, या चित्रपटात जॉन अब्राहमचेही दुहेरी पात्र आपल्याला दिसू शकते.

पाहा जॉन अब्राहमने शेअर केलेले ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

 (Bollywood Actor John Abraham starrer Satyameva Jayate 2 movie released date change)

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. 2018च्या अ‍ॅक्शन ड्रामा ‘सत्यमेव जयते’ चा हा सिक्वल आहे. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी दिव्याने तिचा जॉनबरोबर एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत दिव्याने पांढरी साडी परिधान केली होती, यात ती खूपच सुंदर दिसत होती.

त्याच वेळी जॉन अब्राहमने काही काळापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’चे नवे पोस्टर शेअर केले होते. पोस्टर शेअर करताना त्यांने लिहिले, ‘जिस देश की मैया गंगा है, वहां खून भी तिरंगा है.’  टी-सीरीजचे भूषण कुमार ‘सत्यमेव जयते 2’ तयार करत आहेत.

कोण जिंकेल शर्यत?

सलमान आणि जॉनच्या चित्रपटांच्या या ‘तगड्या टक्कर’मुळे आता निर्माता आणि वितरक दोघेही अडचणीत सापडले आहेत. ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते 2’ दोघांनाही बरेच काही गमवावे लागणार आहे आणि बरेच काही धोक्यात देखील आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटांचे निर्माते चांगल्या व्यवसायाची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण या स्टार्सचे चित्रपट अनेक महिन्यांपासून थिएटर बंद पडल्यामुळे प्रदर्शनासाठी प्रलंबित आहेत. आता हे पाहाणे ही मनोरंजक ठरणार आहे की, सलमान आणि जॉनपैकी ही शर्यत कोण जिंकणार आणि कोण हरणार!

(Bollywood Actor John Abraham starrer Satyameva Jayate 2 movie released date change)

हेही वाचा :

Kangana Ranaut | कंगनासोबत काम करणार नाही, राम गोपाल वर्मांचा निर्धार, ‘थलायवी’वर केले मोठे वक्तव्य!

Birthday Special | ‘ती’ घटना घडली नसती, तर आज अमिताभ बच्चनची लेकही असती बॉलिवूडमध्ये! वाचा श्वेता नंदाबद्दल…