‘हे काय वागणं?; नीतू कपूर यांना नातीने ढकललं, व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक्!
कपूर कुटुंबातील या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री नीतू कपूर यांनी मुलगी रिद्धिमा आणि नात समारा यांच्यासोबत फोटोसाठी पोझ दिले. मात्र जशा नीतू नातीजवळ उभ्या राहिल्या, तसं तिने त्यांना हाताने बाजूला केलं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दिवंगत अभिनेता राज कपूर यांचा नातू आणि करिश्मा-करीना-रणबीर कपूर यांचा चुलत भाऊ आदर जैन नुकताच लग्नबंधनात अडकला. आदरने गर्लफ्रेंड आलेखा अडवाणीशी लग्नगाठ बांधली. शुक्रवारी मुंबईत धूमधडाक्यात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला अभिनेता रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, सैफ अली खान यांसह इतर सर्व कुटुंबीय उपस्थित होते. या लग्नसोहळ्यातील विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या व्हिडीओमध्ये ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर सहानी पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ देत असते. यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी समारा सहानीसुद्धा फोटोसाठी उभी राहते. मात्र जेव्हा या दोघींसोबत नीतू कपूर फोटोसाठी येतात, तेव्हा नात समारा यांना हाताने बाजूला ढकलते.
आई रिद्धिमासोबत समारा या लग्नसोहळ्याला पोहोचली. पापाराझींसमोर ती फोटोसाठी पोझ देत असताना आजी नीतू कपूरसुद्धा तिथे येतात. मुलगी आणि नातसोबत फोटो काढण्यासाठी त्या समाराच्या बाजूला उभ्या राहतात. मात्र समारा त्यांना हाताने बाजूला करते. तेव्हा नीतू कपूरसुद्धा थक्क होतात. तरीसुद्धा चेहऱ्यावर हास्य आणून त्या फोटोसाठी पोझ देतात. समाराचं हे वागणं कॅमेऱ्यात कैद झालं असून पापाराझींनी ही व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
samara pushing neetu out of the frame 😭 byu/vishaw_kalra inBollyBlindsNGossip
‘आजीकडून ओरडा मिळाला असेल’, असं एकाने लिहिलं. तर ‘आजी नीतू कपूर बाजूला आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘समाराला कोणत्या तरी गोष्टीचा राग आला असेल’, असा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला आहे. ती अजूनही लहान असून तिला यामुळे ट्रोल करू नका, अशीही विनंती काहींनी केली आहे.
आदर जैन हा रिमा कपूर आणि मनोज जैन यांचा मुलगा आहे. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनेत्री तारा सुतारियाला डेट करत होता. मात्र ताराशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याने तिचीच खास मैत्रीण आलेखाला डेट करण्यास सुरुवात केली. आलेखा ही मुंबईतील उद्योजिका असून तिने डेलॉइट या कंपनीत हॉस्पिटॅलिटी सल्लागार म्हणून काम करत करिअरची सुरुवात केली. काही वर्षे लॉस एंजिलिसमधील डेलॉइटमध्ये काम केल्यानंतर आलेखा मुंबईत परतली.
