Ved | रितेश देशमुखच्या ‘वेड’निमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनोख्या विक्रमाची नोंद

रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट रविवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर आणि 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता हिंदीमध्ये स्टार गोल्ड वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ved | रितेश देशमुखच्या 'वेड'निमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनोख्या विक्रमाची नोंद
'वेड'निमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अनोख्या विक्रमाची नोंदImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 9:38 AM

मुंबई | 11 ऑगस्ट 2023 : येत्या 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता ब्लॉकबस्टर ‘वेड’ या चित्रपटाचा स्टार प्रवाहव वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या निमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने एक अनोखा विक्रम रचला आहे. या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला. वेड चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या अनोख्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला.

ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 1446 छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली. मराठी चित्रपट आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे. वेड चित्रपटात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुखने या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

“स्टार प्रवाह वाहिनीने वेड चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत”, अशा शब्दात रितेश देशमुखने भावना व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, “मराठी चित्रपट हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वेड चित्रपटाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या चित्रपटाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा 20 ऑगस्टला घेऊन येतोय. या चित्रपटासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.”

रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट रविवारी 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर आणि 27 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता हिंदीमध्ये स्टार गोल्ड वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....