Video : ‘ती’ पेंटींग पाहून रितेश देशमुख भावनिक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो.

Video : ती पेंटींग पाहून रितेश देशमुख भावनिक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
| Edited By: | Updated on: Mar 21, 2021 | 7:07 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो. रितेश आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. नुकताच रितेशने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश एका पेटींगचे काैतुक करताना दिसत आहे. रितेशच्यासोबत व्हिडीओमध्ये ज्याने हि पेंटींग तयार केली आहे तो गाैरव देखील आहे आणि रितेश त्याचे आभार मानताना दिसत आहे. (Riteish Deshmukh shared the video with the painting on social media)

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 75 वी जयंतीनिमित्त रितेश देशमुख याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला होता. विलासरावांच्या पोषाखाला बिलगून रितेश त्यांचं अस्तित्व जाणवून घेताना दिसत होता. “अभी मुझमे कही बाकी है थोडीसी जिंदगी” या गाण्याच्या पार्श्वभूमीवर रितेशने हा व्हिडिओ शेअर केला होता. व्हिडिओच्या अखेरीस विलासरावांची तस्वीरही दिसत होती. तर रितेश आणि विलासरावांचा एक पाठमोरा फोटोही यामध्ये होता. रितेशने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले होते की, तुमची नेहमी आठवण येते.

आता याचं व्हिडीओचे पेंटिंग तयार करण्यात आले आहे. या पेंटिंग विषयी सांगताना रितेश म्हणाला की, आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण गाैरव यांनी एवढे चांगले पेंटींग इमोशनल माझ्यासाठी तयार केले आहे. माझ्या आयुष्यातला जो सार आहे तो हा आहे. वडील काय असतात आणि माझ्यासाठी माझे वडिल काय आहेत हे या पेंटिंगमधून दिसत आहे आणि यासाठी मी खरोखरच गाैरवचा आभारी आहे. रितेशचा हा व्हिडीओ त्याच्या चाहत्यांना देखील खूप आवडला आहे.

संबंधित बातम्या : 

पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप ! अमेरिकेत खास भारतीय नावाचं ‘इंडियन रेस्टॉरंट’

अखेर सुशांतच्या आत्महत्येवर क्रिती सेनॉनने सोडलं मौन, म्हणाली….

Mumbai Saga BO Collection Day 1: ‘मुंबई सागा’ची दणक्यात सुरुवात, पहिल्याच दिवशी कोटींची कमाई

(Riteish Deshmukh shared the video with the painting on social media)