पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप ! अमेरिकेत खास भारतीय नावाचं ‘इंडियन रेस्टॉरंट’

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेत हॉटेल जगतात व्यवसायासाठी उतरली आहे (Priyanka chopra share her New York Restaurant SONA photos).

पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप ! अमेरिकेत खास भारतीय नावाचं 'इंडियन रेस्टॉरंट'
पैशाला पैसे लावत, प्रियंकाची आणखी एक गरुडझेप !

मुंबई : आपल्याजवळ असलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीचा आपल्याला चांगला फायदाच होतो. जगभरात अनेक लोक आपल्या पैशांची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करतात. सर्वसामान्य माणूस एखादं घर किंवा शेती घेऊन पैशांची गुंतवणूक करतो. त्या गुंतवणुकीतून चांगला फायदा व्हावा, हाच एक त्यामागचा प्रांजळ हेतू असतो. तसाच प्रांजळ हेतून मनात घेऊन बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा अमेरिकेत हॉटेल जगतात व्यवसायासाठी उतरली आहे (Priyanka chopra share her New York Restaurant SONA photos).

प्रियंकाचं अमेरिकेत रेस्टॉरंट

प्रियंका चोप्रा सध्या विदेशात स्थायिक झालीय. प्रियंकाने 2018 साली बॉयफ्रेंड निक जोनस सोबत विवाह केला होता. तेव्हापासून ती अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात वास्तव्यास आहे. आतातर प्रियंकाने अमेरिकेत व्यवसायदेखील सुरु केलाय. प्रियंकाने पती निक सोबत मिळून न्यूयॉर्कमध्ये रेस्टॉरंट सुरु केलंय. विशेष म्हणजे या रेस्टॉरंटला भारतीय नाव देण्यात आलंय. या रेस्टॉरंटला नाव ‘सोना असं ठेवण्यात आलंय. प्रियंकाने स्वत: ट्विट करुन आपल्या रेस्टॉरंटची अधिकृत वेबसाईट सुरु झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.

प्रियंका ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाली?

न्यूयॉर्क शहर आता आमची वेबसाईट लाईव्ह आहे, असं प्रियंकाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. प्रियंकाच्या या ट्विटवर तिला जगभरातून लाखो लोकांकडून तिला शुभेच्छा दिल्या जात आहे. प्रियंकाने याआधी देखील बंबल नावाच्या एका मोठ्या डेटिंग अॅपसोबत करार केला होता. त्याआधी तिने हेअर प्रोडक्टशी संबंधित एक ब्रँडदेखील लॉन्च केलं होतं. प्रियंका सतत कुठल्यान कुठल्या माध्यमातून गुंतवणूक करुन व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असते.

प्रियंकाच्या रेस्टॉरंटमध्ये खास काय?

विशेष म्हणजे प्रियंकाचं हे रेस्टॉरंट भारतीयांसाठी खास असणार आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये भारतातील सर्व पदार्थ बनवून मिळणार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रियंकाने आपल्या रेस्टॉरंटच्या इंटीरियरकडे चांगलं लक्ष दिलंय. हे रेस्टॉरंट लहान जरी असलं तरी खूप सुंदर बनवण्यात आलंय. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे रेस्टॉरंट सुरु केलं जाण्याची शक्यता आहे.

प्रियंकाने याआधीही फोटो शेअर केलाय

काही दिवसांपूर्वी प्रियंका पतीन निक सोबत रेस्टॉरंटमधला फोटो शेअर केला होता. या फोटोत दोघं पूजा करताना दिसले होते. त्यानंतर अखेर प्रियंकाने रेस्टॉरंटबाबतची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे (Priyanka chopra share her New York Restaurant SONA photos).

हेही वाचा : Photo : ‘कपल गोल्स’, नेहा कक्कर आणि रोहनप्रीतचे रोमँटिक फोटो