अखेर सुशांतच्या आत्महत्येवर क्रिती सेनॉनने सोडलं मौन, म्हणाली….

गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांचे निधन झाले.

अखेर सुशांतच्या आत्महत्येवर क्रिती सेनॉनने सोडलं मौन, म्हणाली....
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 4:34 PM

मुंबई : गेल्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांचे निधन झाले. सुशांत आणि क्रिती सॅनॉन हे दोघे खूप चांगले मित्र होते. मात्र, सुशांतच्या आत्महत्येनंतर क्रितीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यावेळी सुशांतच्या चाहत्यांना क्रितीवर बरीच टिका देखील केली होती. आता एवढ्या दिवसांनंतर यावर क्रिती खुलासा केला आहे. क्रिती म्हणाली की, त्यावेळी सर्वच ठिकाणी एवढा गोंधळ सुरू होता. सर्वजणच त्यावर काही ना काही बोलत होते. (Kriti Sanon speak on sushant singh rajput death)

एक वेळ अशीही आली की, या सर्वात मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता दिसू लागली होती आणि मला नकारात्मकतेत सहभागी व्हायचं नव्हतं. त्यावेळी मला काय जाणवत होते किंवा किती दुःख झालं होतं हे केवळ मलाच माहीती होतं आणि मला ते स्वतःपूरतच ठेवयचं होतं. मला काय वाटतंय किंवा काय जाणवतं आहे हे मी कोणाला सांगावं असं मला त्यावेळी वाटलं नाही. त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं. या व्यतिरिक्त तुम्हाला सोशल मीडियावर जे बोलायचं ते तुम्ही बोलू शकता.

बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. क्रितीसोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. क्रिती सॅनॉन आणि सनीचा हा एक मोठा चित्रपट आहे. या चित्रपटात सामील झाल्याने दोघेही खूप आनंदी होते. क्रितीने सनी, प्रभास आणि चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतसोबतचे फोटो शेअर केले होते.

यामध्ये प्रभास, क्रिती आणि सनी पारंपारिक लूकमध्ये दिसले होते आणि क्रिती व सनीच्या चेहऱ्यावर चित्रपटाबद्दलचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. हा फोटो शेअर करताना क्रितीने लिहिले होते की, ‘एका नव्या प्रवासाची सुरुवात… आदिपुरुष. हा चित्रपट खूप खास आहे. या जादुई दुनियेशी कनेक्ट केले आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.

संबंधित बातम्या : 

राजकुमारीचा थाट, दुधाने आंघोळ, अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशीचा अनोखा अंदाज

Mumbai Saga BO Collection Day 1: ‘मुंबई सागा’ची दणक्यात सुरुवात, पहिल्याच दिवशी कोटींची कमाई

(Kriti Sanon speak on sushant singh rajput death)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.