Mumbai Saga BO Collection Day 1: ‘मुंबई सागा’ची दणक्यात सुरुवात, पहिल्याच दिवशी कोटींची कमाई

जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:35 PM, 20 Mar 2021
Mumbai Saga BO Collection Day 1:  ‘मुंबई सागा’ची दणक्यात सुरुवात, पहिल्याच दिवशी कोटींची कमाई

मुंबई : जॉन अब्राहम (John Abraham) आणि इमरान हाश्मीचा (Emraan Hashmi) ‘मुंबई सागा’ (Mumbai Saga) हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला आहे. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या कोरोना काळातही पहिल्याच दिवशी चित्रपटाने 2 कोटी रुपये कमावले असल्याचा रिपोर्ट आहे. शुक्रवारी हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही वेळेतच चित्रपटाची लिंक लीक झाली होती. (On the first day of the movie mumbai Saga 2 Earnings of crores)

मुंबई सागाबद्दल बोलायचे तर, जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे, जो प्रसिद्ध गुंड अमर्त्यराव उर्फ ​​डीके रावच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. जॉन आणि इमरान व्यतिरिक्त या चित्रपटात जॅकी श्रॉफ, रोनित रॉय, सुनील शेट्टी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्याही झलक आहे. व्यापार विश्लेषक गिरीश जोहर म्हणाले होते की, ‘मुंबई सागा’कडून कमाईची जास्त शक्यता आहे.

रिव्ह्यू
संजय गुप्ता यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला समजेल की मुंबई सागामध्ये फारसे नवीनपण काही नाही. त्याच्या जुन्या चित्रपटांप्रमाणेच पोलिस आणि चोर यांच्यातील गेम दिसेल. विजयची भूमिका इमरान हाश्मी आणि अमृत्य जॉन अब्राहमने साकारली आहे. जॉनला गॅंगस्टर बनवताना, दिग्दर्शकाने प्रथम अर्धा भाग टाकला आणि पोलिस त्याला कसे पकडू इच्छितात हे दाखवण्यात आले आहे. अर्जुनला गुंडांनी मारुन टाकल्यानंतर अमृत्य माफिया होण्याचा निर्णय घेतो.

जॉन अब्राहमने सध्या सत्यमेव जयते 2 चे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात जॉनसोबत दिव्या खोसला कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 12 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय जॉन शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणसोबत पठाण चित्रपटातसुद्धा दिसणार आहे. इमरान हाश्मी चेहरे या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. इम्रानबरोबर अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही पहिल्यांदा एकत्र काम करताना दिसतील.

संबंधित बातम्या : 

Riteish-Genelia | दुसऱ्या अभिनेत्रीच्या हातांचं चुंबन, चिडलेल्या जेनेलियाने केली रितेशची धुलाई, पाहा Video

Video | जेव्हा ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना शेतात नांगर चालवते, पाहा व्हिडीओ!

Ananya Panday | बहिणीनेच केलेला अनन्या पांडेचा मोबाईल नंबर लीक, वाचा पुढे काय-काय घडलं….

(On the first day of the movie mumbai Saga 2 Earnings of crores)