AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Riteish Deshmukh: तू आधी फराहसोबत काम कर, मग बोल..; प्राजक्ताला रितेश देशमुख स्पष्टच बोलला..

Riteish Deshmukh: नुकत्याच एका कार्यक्रमात अभिनेत्री आणि इन्फ्लुएन्सर प्राजक्ता कोळीने रितेश देशमुखची मुलाखत घेतली. यावेळी त्याने दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खानबद्दल तिला थेट प्रश्न विचारला.

Riteish Deshmukh: तू आधी फराहसोबत काम कर, मग बोल..; प्राजक्ताला रितेश देशमुख स्पष्टच बोलला..
Prajakta Koli and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2026 | 8:58 AM
Share

रितेश देशमुख आणि फराह खान यांची जोडी सध्या चर्चेत आहे. ‘लॉक अप सिझन 2’मध्ये दोघांनी एकत्र सूत्रसंचालन केल्यानंतर त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचीही चर्चा झाली. नुकत्याच मुंबईत झालेल्या ‘FICCI फ्रेम्स 2026’ कार्यक्रमात दोघं पुन्हा एकत्र दिसले. यावेळी अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर प्राजक्ता कोळीने त्यांची मुलाखत घेतली. या संवादादरम्यान रितेशने फराह खानच्या स्वभावाबद्दल केलेल्या मिश्कील वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. प्राजक्ताने या संवादात फराह खानचं कौतुक करत ती प्रेमळ आणि चांगली व्यक्ती असल्याचं सांगितलं. मात्र, रितेशने लगेचच तिला एक मजेदार प्रश्न विचारला. ‘तू फराहसोबत काम केलं आहेस का?’ असं त्याने प्राजक्ताला विचारलं. त्यावर प्राजक्ताने अद्याप तिच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं सांगितलं.

यावर रितेशने प्राजक्ताला थेट सल्ला दिला की, एखाद्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव घेतल्यानंतरच तिच्याबद्दलचं मत तयार करावं. फराहसोबत काम केल्यानंतर मात्र तिच्या सतत बोलण्याच्या सवयीची कल्पना येईल, अशी मिश्कील टिप्पणी त्याने केली. “तू तिच्यासोबत काम कर, मग नंतर तूच तिला बोलशील की, अरे गप्प बस फराह..” असं तो मजेशीरपणे बोलला. रितेशच्या या विनोदावर तिथे एकच हशा पिकला.

पहा व्हिडीओ-

‘लॉक अप 2’चा अनुभवही सांगितला

या कार्यक्रमात रितेशने ‘लॉक अप सिझन 2’मध्ये फराहसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. त्याच्या मते, हा अनुभव नेहमीच्या कामापेक्षा वेगळा होता. दोघांनी शोच्या निमित्ताने बराच वेळ एकत्र घालवला आणि त्यातून मनोरंजनासोबतच अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. रितेशने विशेषतः शोदरम्यान सहभागी झालेल्या व्यक्तींच्या स्वभावाचे विविध पैलू समोर आल्याचं सांगितलं. त्यामुळे हा अनुभव केवळ कार्यक्रम सादर करण्यापुरता मर्यादित राहिला नाही, तर माणसांना समजून घेण्याची संधीही मिळाली, असं त्याने स्पष्ट केलं.

फराहसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

रितेश आणि फराह यांनी ‘लॉक अप सिझन 2’चं सूत्रसंचालन केलं. दोघंही मनोरंजन क्षेत्रात दीर्घकाळापासून कार्यरत असल्याने त्यांच्यातील संवादात सहजपणा दिसून आला. रितेशने यापूर्वीही फराहसोबत काम करताना कोणतीही स्पर्धेची भावना नसल्याचं सांगितलं होतं. त्याने फराहला अनेक वर्षांपासून ओळखत असल्याचंही नमूद केलं होतं. दरम्यान, फराह खाननेही ‘लॉक अप’चा अनुभव तिच्यासाठी खास असल्याचं म्हटलं आहे. रितेशसोबत या शोमध्ये काम करताना दोघांनी आपापली शैली जपल्याचं तिने सांगितलं.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना