AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani | रणवीर-आलियासह कलाकारांनी घेतली तगडी फी; जाणून घ्या मानधन

2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय' या चित्रपटानंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करतेय. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन स्वीकारलं आहे. रणवीर-आलियासह इतर कलाकारांनी किती फी घेतली, ते जाणून घेऊयात..

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani | रणवीर-आलियासह कलाकारांनी घेतली तगडी फी; जाणून घ्या मानधन
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 24, 2023 | 2:38 PM
Share

मुंबई | 24 जुलै 2023 : करण जोहर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन करतोय. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा त्याचा बहुचर्चित चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच इतरही दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटानंतर ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करतेय. या चित्रपटासाठी कलाकारांनी तगडं मानधन स्वीकारलं आहे. रणवीर-आलियासह इतर कलाकारांनी किती फी घेतली, ते जाणून घेऊयात..

रणवीर या चित्रपटात रॉकी रंधावाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याने 25 कोटी रुपयांचं मानधन स्वीकारल्याचं कळतंय. तर आलिया यामध्ये रानी चॅटर्जीच्या भूमिकेत आहे. आलियाने 10 कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी रॉकीच्या आजोबांची भूमिका साकारली आहे. यासाठी त्यांना दीड कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर जया बच्चन या रॉकीच्या आजीच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्यांनी एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. रानीच्या आजीच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्री शबाना आझमी यांनीसुद्धा एक कोटी रुपये फी घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर कात्री चालवल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्द, एका दारुच्या ब्रँडचं नाव आणि त्याचसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाशी संबंधित एक संपूर्ण डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे. यातील एका सीनमध्ये ‘ओल्ड माँक’ या रम ब्रँडचा उल्लेख आहे. त्याचं नाव बदलून ‘बोल्ड माँक’ असं ठेवलंय. यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित एक सीन होता. हा सीन ट्रेलरमध्येही पहायला मिळाला होता. या सीनमधील एका शब्दाला काढून त्या जागी एखादा फिल्टर टाकण्यास सांगितलं गेलंय. रवींद्रनाथ टागोर यांचा चित्रपटातील उल्लेख तसाच आहे की काढलाय हे मात्र अस्पष्ट आहे.

चित्रपटातील एका डायलॉगमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा उल्लेख आहे. कारण चित्रपटात आलिया एका बंगाली कुटुंबातील मुलगी दाखवण्यात आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित संपूर्ण डायलॉग चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.