AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘खल्लास गर्ल’ ईशा कोपिकरचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीपासून विभक्त

'खल्लास' या गाण्यातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री ईशा कोपिकर अधिकृतरित्या पती रोहित नारंगपासून विभक्त झाली आहे. घटस्फोटाच्या काही वर्षांआधीपासूनच ती वेगळी राहत होती. नऊ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ईशाने रोहितचं घर सोडलं होतं. आता याप्रकरणी रोहितने मौन सोडलं आहे.

'खल्लास गर्ल' ईशा कोपिकरचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर पतीपासून विभक्त
ईशा कोपिकरचा घटस्फोटImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2023 | 8:30 AM
Share

मुंबई : 29 डिसेंबर 2023 | बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा कोपिकरने पती रोहित (टिम्मी) नारंगला घटस्फोट दिला आहे. 14 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात रोहित आणि ईशा औपचारिकरित्या विभक्त झाले. ईशाचा पती रोहित हा हॉटेलिअर आहे. घटस्फोटाच्या काही वर्षांपूर्वी ईशा तिच्या नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन वेगळी राहू लागली होती. रियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित नारंगने घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे. “ईशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे झालो आहोत. आमच्यासाठी हा खूप कठीण काळ आहे”, असं त्याने म्हटलंय.

ईशाने तिच्या घटस्फोटाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रोहित आणि ईशा यांच्यात बऱ्याच गोष्टींवरून पटत नसल्याने सतत भांडणं व्हायची, अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिली आहे. दोघांनी नात्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही. अखेर ईशाने मुलीला घेऊन वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. ईशा आणि टिम्मी यांची पहिली ओळख एका जिममध्ये झाली होती. एकमेकांना डेट करण्यापूर्वी दोघं तीन वर्षांपर्यंत चांगले मित्र होते.

नोव्हेंबर 2009 मध्ये ईशा आणि राहुलने लग्न केलं. त्यानंतर जुलै 2014 मध्ये ईशाने मुलगी रियानाला जन्म दिला. 2002 मध्ये ‘कंपनी’ या चित्रपटातील ‘खल्लास’ या गाण्यामुळे ईशाला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तिने ‘डरना मना है’, ‘कृष्णा कॉटेज’, ‘हम तुम’, ‘क्या कुल है हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ईशा आणि रोहित हे अधिकृतरित्या विभक्त झाले असले तरी अद्याप इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने तिच्या नावापुढील नारंग हे आडनाव काढलेलं नाही. “मी सध्या याबद्दल बोलण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा”, अशी विनंती तिने केली आहे.

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय