त्या धक्कादायक प्रकारानंतर पुन्हा राखी आणि मीका मुकाट्याने एकत्र, म्हणाले, आम्ही…
Rakhi Sawant-Mika Singh Dance Video: बळजबरी किस प्रकरण... पुन्हा एकत्र आले मीका सिंग आणि राखी सावंत.... दोघांचा 'तो' व्हिडीओ पाहून म्हणाल..., राखी सावंत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Rakhi Sawant-Mika Singh Dance Video: बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) आणि पंजाबी गायत मीका सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अनेक वर्षांपूर्वी राखी हिने मीका सिंग यांच्यावर गंभीर आरोप केलेल… मीका सिंग याने बळजबरी किस केलं… असे आरोप राखीने केले होते. तेव्हा दोघांचा व्हिडीओ देखील व्हायरल झालेला. आता अनेक वर्षांनंतर दोघांमधील वाद मिटले आहे. दोघांना एका रेस्टोरेंटमध्ये स्पॉट करण्यात आलं. रेस्टोरेंटमध्ये दोघांनी एकत्र डान्स देखील केला. सध्या सर्वत्र मीका सिंग आणि राखी सावंत यांच्या व्हिडीओची चर्चा सुरु आहे… व्हायरल झालाय मीका – राखी यांचा रोमँटिक व्हिडीओ…
सोशल मीडियावर राखी सावंत (Rakhi Sawant) आणि मीका (Mika Singh) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघेही रोमँटिक डान्स करताना दिसले… व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे… अखेर झालेल्या त्या वादानंतर दोघे पुन्हा चांगले मित्र झाले आहे.
एवढंच नाही तर, जुन्या वादावर मीका सिंग याने स्पष्टीकरण देखील दिलं आहे. गायक म्हणाला, ‘जुने वाद आता आम्ही विसरलो आहोत. आता आम्ही चांगाले मित्र आहोत आणि एकमेकांसोबत बोलतो देखील…’ व्हिडीओच्या शेवटी मीकाने प्रेमात राखीला मिठी मारली. दोघांच्या व्हिडीवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
काय आहे राखी आणि मीका यांच्यातील वाद?
2006 मध्ये मीका सिंग याने वाढदिवसासाठी पार्टी ठेवली होती. पार्टीमध्ये राखी सावंत देखील आली होती. तेव्हा मीका याने राखी हिला बळजबरी किस केलं… त्यानंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात मीकाविरुद्ध खटला दाखल केला. हा वाद जवळजवळ दोन दशके चर्चेत राहिला, पण आता दोघांनी भूतकाळ विसरून मैत्रीचा हात पुढे केला आहे.
राखी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिने अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. राखील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. पण राखीने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
