AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो’ 6 रुपये घेऊन आलेला मुंबईत, हॉटेलात धुतलीत भांडी अन् आता बनलाय बॉलिवूडमधील बडा अभिनेता!

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक स्टार कलाकारांनी शून्यातून सुरूवात केली होती. आपल्या अभिनयाच्या आणि मेहनातीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. असाच एक अभिनेता आहे जो अवघे 6 रूपये घेऊन मुंबईत आला होता आणि आता मोठ्या स्टार कलाकरांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होतो.

'तो' 6 रुपये घेऊन आलेला मुंबईत, हॉटेलात धुतलीत भांडी अन् आता बनलाय बॉलिवूडमधील बडा अभिनेता!
| Updated on: Jul 11, 2023 | 8:38 PM
Share

मुंबई : मुंबईला मायानगरी म्हटलं जातं, प्रत्येकजण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येत असतं. प्रत्येकजण अभिनेता किंवा अभिनेत्री होण्याचा स्वप्न घेऊन मुंबईत ते पूर्ण करण्यासाठी येत असतात. यासाठी ते भरपूर स्ट्रगल करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक स्टार कलाकारांनी शून्यातून सुरूवात केली होती. आपल्या अभिनयाच्या आणि मेहनातीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीये. असाच एक अभिनेता आहे जो अवघे 6 रूपये घेऊन मुंबईत आला होता आणि आता मोठ्या स्टार कलाकरांच्या यादीमध्ये त्याचा समावेश होतो.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉय आहे. ज्याने आज स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. पण त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. जेव्हा रोनित रॉय मुंबईत करिअर करण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने हॉटेलमध्ये भांडी साफ करण्याचं काम केलं होतं. तर दुसरीकडे तो मॉडेलिंग देखील करत होता.

यामध्येच एक असा तरुण आहे जो अभिनेता होण्याचा स्वप्न घेऊन मुंबईत आला होता. त्याच्या वडिलांकडे त्यावेळी एवढे पैसेही नव्हते. पण त्याची प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासोबत चांगली मैत्री होती. त्यामुळे तो तरुण चार वर्षे सुभाष घई यांच्यासोबत राहिला आणि त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत स्ट्रगल करत असताना सिनेसृष्टी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष सांगायचं झाल्यास रोनित रॉयला हॉटेलमध्ये 600 रुपये पगार होता. तेव्हा त्याने त्याचा पहिला पगार त्याच्या आईला पाठवला होता. तसेच रोनितने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याने एक ऑडिशन दिलं होतं त्यानंतर त्याला दिग्दर्शक दीपक बलराज यांनी ‘जान तेरे नाम’ या चित्रपटाची ऑफर दिली होती. तिथून त्याच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं पण नंतर चार-पाच वर्षांनी त्याला काम मिळायचं बंद झालं होतं. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत सापडला होता.

रोनितला आर्थिक अडचणी आल्यानंतर त्याचे त्याच्या पहिल्या पत्नीसोबत नातं देखील बिघडलं होतं. त्यानंतर त्याला त्याच्या मुलीपासून देखील वेगळं व्हावं लागलं होतं. त्याचबरोबर या अडचणीनंतर रोनितने टीव्हीमध्ये पदार्पण केलं. मग त्याने कसौटी जिंदगी की, क्यू की सास भी कभी बहू भी, अदालत या मालिकांमध्ये काम करत स्वतःचे एक वेगळं स्थान निर्माण केले. त्यानंतर रोनितने टू स्टेटस, मुन्ना मायकल, शूटआउट ॲट वडाला, उडान यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.