धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा, तर रुग्णालयातून रडत बाहेर आला बॉबी देओल, Video समोर

Dharmendra Hospitalised: धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे... कुटुंबियांकडून माहिती, तर दुसरीकडे रुग्णालयातून रडत बाहेर आला बॉबी देओल, व्हिडीओ सर्वत्र व्हायरल, चाहत्यांकडून चिंता व्यक्त

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा, तर रुग्णालयातून रडत बाहेर आला बॉबी देओल, Video समोर
फाईल फोटो
| Updated on: Nov 11, 2025 | 12:16 PM

Dharmendra Hospitalised: गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा देखील पसरत आहेत. एका आतल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “धर्मज यांची प्रकृती ठीक नाही. दरम्यान, सोमवारी संध्याकाळपासून रुग्णालयाबाहेर कलाकारांची गर्दी दिसून येत आहे.” अनेक चर्चा रंगत असताना अभिनेता बॉबी देओल याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेता भावुक झाल्याचं दिसून येत आहे.

सांगायचं झालं तर, धर्मेंद्र व्हेंटिलेटर आहेत… अशा चर्चा सुरु असताना, अभिनेता सनी देओल याच्या टीमने मोठी माहिती दिली. ‘धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर आहे… आणि त्यांच्या डॉक्टरांच्या देखरेखीली ठेवण्यात आलं आहे… एवढंच नाही तर, ते लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रर्थना कार…’ असं देखील अभिनेत्याच्या टीमकडून सांगण्यात आलं..

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब आहे… हेमा मालिनी देखील यावेळी धर्मेंद्र यांच्यासोबत आहे. तर बॉबी देओल याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बॉबी याला पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं… तेव्हा भावुक असलेल्या बॉबीने स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

 

 

सध्या बॉबी देओल याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘काय झालं बॉबी? देओल कुटुंबातील प्रत्येक जण अत्यंत भावुक आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ज्या पुरुषाच्या डोळ्यात पाणी असतं, तो पुरुष धीट नाही… असं काहीही नसतं…’, तिसरा नेटकरी म्हणाली, ‘आजारी वडिलांसाठी डोळ्यातून पाणी आलं आहे…’, सध्या बॉबीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे…

धर्मेंद्र यांचे सिनेमे

धर्मेंद्र यांनी सहा दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं. 2012 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या सिनेमातून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

एकापेक्षा एक सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले… ज्यामध्ये ‘फूल और पत्थर’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘धर्मवीर’, ‘आंखें’, ‘राजा जानी’, ‘गुलामी’, ‘प्रतिज्ञा’, ‘नया जमाना’, ‘द बर्निंग ट्रेन’ आणि ‘यादों की बारात’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारली…