AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सागर कारंडे 61 लाखांची फसवणूक प्रकरण, पोलिसांकडून मोठी कारवाई

'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

सागर कारंडे 61 लाखांची फसवणूक प्रकरण, पोलिसांकडून मोठी कारवाई
| Updated on: Apr 17, 2025 | 11:23 AM
Share

मराठमोळा विनोदवीर सागर कारंडेची 61 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे सागर कारंडे याच्या चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून सायबर फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्यामुळे याप्रकरणातील सत्य लवकरच सर्वांसमोर येईल.

सागर कारंडे याची प्रतिक्रिया…

सागर कारंडे फसवणुकीमुळे चर्चेत आल्यानंतर खुद्द अभिनेत्याने 5 एप्रिल रोजी यावर प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे 61 लाख रुपये कसे असतील? असा प्रश्न देखील अभिनेत्याने उपस्थित केलेला. ‘यामध्ये काहीही तथ्य नाही. असं काहीही झालेलं नाही. माझ्याकडे 61 लाख रुपये कसे असतील? एवढे पैसे माझ्याकडे असते तर, बाकीच्या गोष्टी का केल्या असत्या. मा एखाद्या नाटकाची निर्मिती केली असती… 61 लाख रुपये ही माझ्यासाठी फार मोठी रक्कम आहे…’

याप्रकरणी पोलिसांनी मदत घेणार – सागर कारंडे

61 लाख रुपयांचा फसवणुकीमुळे चर्चेत असणारा सागर कारंडे म्हणाला, ‘याप्रकरणी मी पोलिसांची मदत घेणार आहे. मी अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणारा आहे.’ चाहत्यांबद्दल अभिनेता म्हणाला, ‘असं काही घडलंच नाही त्यामुळे चाहते दुखावण्याचा प्रश्नच येत नाही… सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे… कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये… एवढं सरळ आणि साधं काम आहे…’ असं देखील सागर म्हणाला.

नक्की काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी सागर कारंडे याची 61 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. एका अनोळखी महिलेने सागर कारंडेला 25 फेब्रुवारी रोजी एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. व्हॉट्सअ‍ॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणं झाल्याची देखील माहिती समोर आली. त्यावेळी महिलेने त्याला एक स्किम सांगितली होती. तिने इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट ‘लाईक’ करण्याचे काम देऊ केलं होतं आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील, असे देखील सांगितले होते.

दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असेही तिने म्हटलं होतं. सागरने तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला. त्या महिलेने तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानंतर सागरने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.

पण सागर कारंडेने यावर प्रतिक्रिया देत तो व्यक्ती मी नाही… माझ्यासोबत असे काही घडले नाही… मी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आणि आता याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतंल आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा