AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सई ताम्हणकर हिच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री? फोटो शेअर करत म्हणाली…

प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर कोणाला करतेय Miss? दोघांच्या 'या' फोटोंवर बसणार नाही अभिनेत्रीच्या चाहत्यांचा विश्वास

सई ताम्हणकर हिच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री? फोटो शेअर करत म्हणाली...
| Updated on: Mar 03, 2023 | 11:59 AM
Share

Sai Tamhankar : ‘मीमी’, ‘दुनियादारी’, ‘तू ही रे’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ अशा अनेक एकापेक्षा एक सिनेमात वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात घर करणारी अभनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) कायम तिच्या सिनेमांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. पण आता आपल्या घायाळ अदांनी चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणारी सई तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सईच्या तिचं खासगी आयुष्य कायम गुपित ठेवते. पण आता समोर आलेल्या एका फोटोमुळे अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल चर्चा रंगत आहे. सईने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसोबत दिसत आहे.

सई हिने निर्माता अनिश जोग याच्यासोबत एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘Miss You’ असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र सईच्या फोटोची चर्चा रंगत आहे. पण निर्माता अनिश जोग याच्यासोबत असलेल्या नात्याबाबत अभिनेत्रीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Sai Tamhankar boyfriend)

फोटोमध्ये अनिश जोग आणि सई फार सुंदर दिसत आहेत. फोटोमध्ये सईने अनिश याच्या गालावर हात ठेवला आहे. सध्या सर्वत्र सई आणि अनिश यांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. याआधी देखील सईने अनिशसोबत फोटो शेअर केले आहेत. पण नात्याचा खुलासा अद्याप केलेला नाही. त्यामुळे सईच्या आयुष्याच खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे का? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

अनिश जोग याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तो एक चित्रपट निर्माता आहे. अनिश याने आतापर्यंत ‘टाईमप्लीज’, ‘व्हायझेड’, ‘मुरांबा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’ या सिनेमांची निर्मिती केली आहे. सई आणि अनिश एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. शिवाय दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. (Sai Tamhankar life style)

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अनेकांच्या मनावर राज्य करणारी आणि मराठी कलाविश्वातच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील फार कमी वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून सईची ओळख आहे. शिवाय सई कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. पण आता सई अनिशसोबत पोस्ट केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

सईचे सोशल मीडियावर देखील असंख्य चाहते आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सई कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईच्या प्रत्येक फोटोवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात.

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.