5 हजार कोटींची प्रॉपर्टी! मात्र एक रुपयाही देऊ शकत नाही तैमूरसह आपल्या चार मुलांना, सैफ अली खानची नेमकी काय अडचण?

हरियाणाच्या पतौडी पॅलेसशिवाय सैफच्या अनेक प्रॉपर्टी भोपाळमध्ये आहेत. सैफला ही संपत्ती त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे. पण सैफ त्याच्या चार मुलांच्या म्हणजेच मुलगी सारा अली खान आणि मुलगे इब्राहिम अली खान, सैफ अली खान, जेह अली खान यांच्या नावावर ही मालमत्ता करु शकत नाही.

5 हजार कोटींची प्रॉपर्टी! मात्र एक रुपयाही देऊ शकत नाही तैमूरसह आपल्या चार मुलांना, सैफ अली खानची नेमकी काय अडचण?
वनिता कांबळे

|

Aug 16, 2022 | 6:43 PM

नवी दिल्ली : पतौडी घराण्याचा दहावा नवाब सैफ अली खानने(Saif Ali Khan) त्याच्या वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. सैफ नुकताच 52 वर्षांचा झाला आहे. सैफ त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. या पर्सनल आणि प्रोफेशनल कारणांशिवाय चर्चेत असतो ते त्याच्या पाच हजार कोटींच्या प्रॉपर्टीमुळे. मात्र, सैफ तैमूरसह त्याच्या चार मुलांना या पाच हजार कोटींच्या प्रॉपर्टी पैकी एक रुपयाही देऊ शकत नाही. किंवा त्याची मुले त्याच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाहीत. या मध्ये एक मोठी कायदेशीर अडचण आहे. यामुळे ही प्रॉपर्टी मिळवायची असल्यास सैफच्या मुलांना मोठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे.

सैफला ही संपत्ती त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून वारसाहक्काने मिळालेय

हरियाणाच्या पतौडी पॅलेसशिवाय सैफच्या अनेक प्रॉपर्टी भोपाळमध्ये आहेत. सैफला ही संपत्ती त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडून वारसाहक्काने मिळाली आहे. पण सैफ त्याच्या चार मुलांच्या म्हणजेच मुलगी सारा अली खान आणि मुलगे इब्राहिम अली खान, सैफ अली खान, जेह अली खान यांच्या नावावर ही मालमत्ता करु शकत नाही.

सैफची मालमत्ता भारत सरकारच्या शत्रू विवाद कायद्यांतर्गत येते

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानच्या पतौडी पॅलेसशिवाय, त्याच्या मालकीची इतर मालमत्ता भारत सरकारच्या शत्रू विवाद कायद्यांतर्गत येते. या कायद्यानुसार या मालमत्तेवर कोणीही आपला हक्क सांगू शकत नाही.

प्रॉपर्टीसाठी सैफच्या मुलांना हाय कोर्ट, सुप्रीम कोर्टसह राष्ट्रपतींकडे जाण्याचाही पर्याय

सैफ अली खानच्या मुलांना त्याच्या 5000 कोटी रुपयांच्या संपत्तीवर हक्क सांगायचा असेल तर त्यांना आधी हायकोर्टात जावे लागेल. येथून हरल्यास ते सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. यानंतर देशाच्या राष्ट्रपतींकडे जाण्याचा पर्यायही त्यांच्याकडे असणार आहे.

सैफ अली खानचे पणजोबा ब्रिटिश राजवटीत नवाब होते

सैफ अली खानचे पणजोबा म्हणजेच त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी यांचे वडील हमीदुल्ला खान हे ब्रिटिश राजवटीत नवाब होते. त्यांनी कधीही आपल्या मालमत्तेसाठी कोणतेही मृत्युपत्र तयार केले नाही. या कारणास्तव जर कोणी या मालमत्तेवर दावा केला तर पाकिस्तानमध्ये राहणारे त्यांचे कुटुंबीय त्याबद्दल वाद निर्माण करू शकतात. सैफ अली खान पतौडी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिले आहेत.

सैफने वयाच्या 21 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले

सैफने वयाच्या 21 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले. अमृतापासून सैफला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने 11 वर्षांनी लहान असलेल्या करीनाशी लग्न केले

अमृता सिंगशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने करीना कपूरशी लग्न केले. करीना सैफ पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. करीना आणि सैफला तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोन मुले आहेत.

सैफ चार मुलांचा बाप

सैफ चार मुलांचा बाप आहे. दोन पत्नींपासून त्याला ही चार मुलं झाली आहेत. चारही मुलांवर तो सारखेच प्रेम करतो आणि सर्वांचा सारखाच सांभाळ करतो.

1993 मध्ये सैफने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले

सैफ अली खानने 1993 मध्ये आलेल्या ‘परंपरा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. मात्र, यानंतर सैफचे आशिक आवारा, मैं खिलाडी तू अनारी, ओंकारा, हम तुम, रेस, रेस 2, लव आज कल, ये दिल्लगी असे अनेक चित्रपट हिट ठरले. लवकरच सैफ विक्रम वेध आणि आदिपुरुष या त्याच्या आगामी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें