Saif Ali Khan: आता कशी आहे सैफची प्रकृती? रुग्णालयाकडून मोठी हेल्थ अपडेट समोर

Saif Ali Khan: गुरुवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर सैफ अली खानचे चाहते चिंतेत, आता कशी आहे अभिनेत्याची प्रकृती? रुग्णालयाकडून मोठी अपडेट समोर, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्या प्रकृतीची चर्चा...

Saif Ali Khan: आता कशी आहे सैफची प्रकृती? रुग्णालयाकडून मोठी हेल्थ अपडेट समोर
| Updated on: Jan 18, 2025 | 8:57 AM

Saif Ali Khan Health Update: अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला गुरुवारी मध्यरात्री झाला होता. हल्लेखोराने अभिनेत्याने सहा वार केले. अशात रक्तबंबाळ सैफला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रिक्षातून अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या लिलावती रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर सहा वार झाले. त्यामधील दोन वार अधिक गंभीर होते. ज्यासाठी सैफची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.

आता रुग्णालयाकडून सैफच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट देण्यात आली आहे. आता अभिनेत्याचं हेल्थ अपडेट रुग्णालय प्रशासनाने जारी केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफची प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम आहे. आता अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.

 

 

सैफ अली खानवर चाकूने केले वार

सैफ अली खानच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकू घुसला आणि तो तुटला, तुटलेल्या चाकूचा टोक शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला आहे. अभिनेत्याच्या मानेला देखील गंभीर जखम झाली आहे. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

 

 

कधी मिळणार डिस्चार्ज

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. पण अभिनेता काही दिवस चालू फिरू शकणार नाही. सैफच्या जखमा अद्याप बऱ्या झालेल्या नाहीत, त्यामुळे अभिनेत्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांना भेटण्यास मनाई करण्यात आली आहे, कारण जखमा बऱ्या झाल्या नाहीत तर संसर्गाचा धोका असू शकतो.