नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…, जेव्हा ‘त्या’ एका फोटोमुळे सुरु झाली सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा
Saif Ali Khan - Kareena Kapoor Khan Divorce Rumours: नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…, ज्योतिषांनी केलाय सैफ - करीना यांच्या घटस्फोटाचा दावा, पण 'त्या' एका फोटोमुळे सुरु झाली सैफ - करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा

Saif Ali Khan – Kareena Kapoor Khan Divorce Rumours: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या लग्नाला आज अनेक वर्ष झाली आहेत. सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण नुकताच, एक ज्योतिषी सुशील कुमार सिंह (Astrloger Sushil Kumaar Singh) यांनी सैफ आणि करीना यांचा घटस्फोट होणार असल्याचा दावा केला आहे. पुढच्या दीड वर्षात सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा घटस्फोट होवू शकतो असं वक्तव्य त्यांनी एका मुलाखतीत केलं.
सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याआधी देखील एका फोटोमुळे सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. जेव्हा अभिनेत्याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा ऐकल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
एकदा अभिनेत्याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफच्या एका टॅटूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला.
पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’, चौथा नेटकरी म्हणतात, ‘आता टॅटू बोलला आहे, काही दिवसांनी पत्नी बदलेल…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’
सैफ आणि करीनाच्या घटस्फोटाबद्दल काय म्हणाले ज्योतिषी…
मुलाखतीत सुशील कुमार सिंह म्हणाले, ‘ही सैफ आणि करीना यांची कुंडली आहे. माझा 2010 चा पूर्वानुमान आहे. मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, हे लग्न फार काळ टिकणार नाही. घटस्फोटाचं कारण घरातील काही कारण असू शकतं. हे प्रकरण मिटणार नाही आणि पुढील दीड वर्षात करीना – सैफ यांचा घटस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.’ सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
