AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan | “आता आमच्या बेडरुममध्ये पण या”; पापाराझींवर भडकला सैफ अली खान, पहा करीनाची प्रतिक्रिया

हे प्रकरण इथेच संपलं नाही. त्यानंतरही जेव्हा पापाराझींनी दोघांचा व्हिडीओ शूट करणं चालूच ठेवलं तेव्हा सैफने आत जाऊन जोरात दरवाजा बंद केला. पापाराझींकडून अनेकदा सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केलं जातं.

Saif Ali Khan | आता आमच्या बेडरुममध्ये पण या; पापाराझींवर भडकला सैफ अली खान, पहा करीनाची प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 03, 2023 | 5:06 PM
Share

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याशिवाय बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जातात. नुकताच या दोघांचा बेधडक अंदाज नेटकऱ्यांना पहायला मिळाला. सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सैफ अली खान संतापलेला दिसत आहे. पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर तो अखेर भडकला आणि त्याचा हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधतोय.

गुरुवारी रात्री सैफ आणि करीना त्यांची खास मैत्रीण मलायका अरोराच्या आईच्या वाढदिवसाच्या पार्टीला एकत्र गेले होते. या वेळी करीनाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. तर सैफ त्याच्या नेहमीच्याच शॉर्ट कुर्ता आणि पायजमाच्या लूकमध्ये दिसला. या पार्टीनंतर दोघं एकमेकांचा हात पकडून घराच्या दिशेने चालू लागले होते. तेव्हा पापाराझींनी या जोडीकडे फोटोसाठी पोझची विनंती केली.

फोटोसाठी पोझ दिल्यानंतर सैफ आणि करीना जेव्हा त्यांच्या घराकडे जाऊ लागले, तेव्हा काही पापाराझी त्यांचा पाठलाग करू लागले. पाठलाग करता करता ते इमारतीच्या गेटपर्यंत जाऊन पोहोचले. यावरूनच सैफ अली खान भडकला आणि त्यांना म्हणाला, “एक काम करा, थेट आमच्या बेडरुममध्येच या.” सैफ असं म्हणताच त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या करीनाला हसू अनावर झालं.

हे प्रकरण इथेच संपलं नाही. त्यानंतरही जेव्हा पापाराझींनी दोघांचा व्हिडीओ शूट करणं चालूच ठेवलं तेव्हा सैफने आत जाऊन जोरात दरवाजा बंद केला. पापाराझींकडून अनेकदा सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचं उल्लंघन केलं जातं. हाच मुद्दा सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आलिया भट्टने यावरून पापाराझींसाठी संतप्त पोस्ट लिहिली होती. तिच्या या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत तिचा पाठिंबा दिला होता.

आलिया तिच्या घरातील लिव्हिंग रुममध्ये बसली असताना दोन फोटोग्राफर्स तिच्या समोरच्या इमारतीच्या टेरेसवरून तिचे फोटो क्लिक करत होते. यावरूनच तिने सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचा मुद्दा उपस्थित केला होता.

सैफ लवकरच ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रामायणाच्या कथेवर आधारित या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारतोय. चित्रपटातील सैफच्या लूकवरून मोठा वाद झाला होता. मात्र व्हीएफएक्सद्वारे हा लूक बदलण्यात येत असल्याचं कळतंय. आदिपुरुषमध्ये सैफसोबत प्रभास आणि क्रिती सनॉन यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...