‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते? जाणून घ्या ‘आर्ची’ची मैत्रीण साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल…

‘सैराट’मधली ‘आनी’ आता काय करते? जाणून घ्या ‘आर्ची’ची मैत्रीण साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीबद्दल...
रिंकू आणि अनुजा

‘आर्ची’, ‘परशा’, ‘लंगड्या’, ‘सल्या’ ही पात्र आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिली आहेत. मात्र, या सगळ्यातच आणखी एक व्यक्तिरेखा भाव खाऊन गेली, ती म्हणजे ‘आर्ची’ मैत्रीण साकारणारी ‘आनी’.

Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 27, 2021 | 9:21 AM

मुंबई : सुपरहिट मराठी चित्रपट ‘सैराट’ (Sairat) याने प्रदर्शित झाल्यापासून अनेक वेगवेगळे विक्रम केले. चित्रपटातील ‘आर्ची’, ‘परशा’, ‘लंगड्या’, ‘सल्या’ ही पात्र आजही प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिली आहेत. मात्र, या सगळ्यातच आणखी एक व्यक्तिरेखा भाव खाऊन गेली, ती म्हणजे ‘आर्ची’ मैत्रीण साकारणारी ‘आनी’. ‘आनी’चं हे पात्र साकारलं होत अभिनेत्री अनुजा मुळे (Anuja Mulay) हिने! ‘सैराट’ या प्रसिद्ध चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या अनुजा मात्र त्यानंतर कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही (Sairat Movie Aani fame Actress Anuja mule latest update).

प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्याप्रमाणेच ‘आर्ची’च्या मैत्रिणीच्या भूमिकेत भाव खाऊन गेलेल्या ‘आनी’ अर्थात अभिनेत्री अनुजा मुळे ही देखील चाहत्यांना आपल्या आयुष्यातील खास घडामोडींची अपडेट देत असते.

सध्या काय करते ‘आनी’?

सैराटच्या ‘आनी’नंतर अनुजा इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. अनुजा सध्या काय करते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही पडला होता. या प्रश्नाचे उत्तर आता तिने स्वतः दिले आहे. नुकतेच तिने ‘Ask Me Now’ हे सोशल मीडिया फिचर वापरत चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तरांचा खेळ खेळला. यात तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला ‘सध्या तू काय करतेस?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा तिने वकिलाच्या कपड्यातील एक फोटो पोस्ट करत, ‘हा प्रश्न विचारणाऱ्या सगळ्यांसाठी उत्तर – वकिली’ असे उत्तर दिले आहे (Sairat Movie Aani fame Actress Anuja mule latest update).

वकिलीत ‘मास्टर्स’ पदवी

‘आनी’ साकारणाऱ्या अनुजा मुळेने या दरम्यान चाहत्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. या दरम्यान एका चाहत्याने तिला विचारले की, ‘तुझं शिक्षण किती झालंय?’ यावर उत्तर देताना अनुजा म्हणाली की, तिने नुकतीच वकिलीत ‘मास्टर्स’ पदवी मिळवली आहे. सहकलाकार अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर यांनी सिनेक्षेत्रात स्वतःची कारकीर्द घडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनुजाने स्वतःसाठी एक वेगळे करिअर निवडले.

अशी झाली होती ‘सैराट’साठी निवड

पुण्यात शिकत असताना अनुजाने एका एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता. यातील ‘चिट्ठी’ या एकांकिकेतील अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळालं. याचवेळी ‘सैराट’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिची निवड ‘आनी’च्या भूमिकेसाठी केली.

(Sairat Movie Aani fame Actress Anuja mule latest update)

हेही वाचा :

Photo : ओम अर्थात शाल्व किंजवडेकरचा वाढदिवस,‘येऊ कशी तशी मी नांदायला’च्या सेटवरच सेलिब्रेशन

सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ शेवटची पोस्ट बहिणीने पुन्हा केली शेअर, म्हणाली…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें