‘लस्ट स्टोरीज’मधील कियाराच्या ‘त्या’ बोल्ड सीननंतर सेक्स टॉइजच्या विक्रीत वाढ; निर्मात्यांकडून खुलासा

'लस्ट स्टोरीज'मधील कियारा अडवाणीचा एक बोल्ड सीन प्रचंड चर्चेत आला होता. चित्रपटातील कियाराच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं खूप आव्हानात्मक असल्याचं करणने त्याच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सांगितलं होतं.

'लस्ट स्टोरीज'मधील कियाराच्या 'त्या' बोल्ड सीननंतर सेक्स टॉइजच्या विक्रीत वाढ; निर्मात्यांकडून खुलासा
Kiara AdvaniImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 11:30 AM

‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या अँथॉलॉजी चित्रपटाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा घडवून आणली होती. या चित्रपटात चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार वेगवेगळ्या कथा दाखवण्यात आल्या होत्या. या चारही कथांमध्ये दाखवलेली एक समान गोष्ट म्हणजे स्त्रियांची कामुकता. यातील एका कथेचं दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं आणि त्यात कियारा अडवाणीने मुख्य भूमिका साकारली होती. कियाराच्या कथेतील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या सीनचा परिणाम काय झाला, याविषयी करण जोहरच्या धर्मा प्रॉडर्शन्सचे निर्माते सोनेम मिश्रा एका मुलाखतीत व्यक्त झाले. ‘लस्ट स्टोरीज’मधील कियाराच्या त्या सीननंतर सेक्स टॉइजच्या विक्रीत प्रचंड वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं.

सेक्स टॉइजच्या विक्रीत वाढ

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’मधील कियाराच्या क्लायमॅक्स सीनची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. या सीनमध्ये कियाराला वायब्रेटर वापरल्याचं दाखवलं गेलंय. आता जवळपास पाच वर्षांनंतर सोमेन मिश्रा हे या सीनच्या परिणामाबद्दल व्यक्त झाले. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “लस्ट स्टोरीजमधील आमची शॉर्ट फिल्म एका विशिष्ट कारणामुळे प्रचंड व्हायरल झाली होती. पण यातून घडलेली सर्वांत रंजक गोष्ट म्हणजे त्यानंतर सेक्स टॉइजच्या विक्रीत झालेली लक्षणीय वाढ. अडल्ट टॉइज विकणाऱ्या एका वेबसाइटने त्यांच्या वार्षिक सर्वेक्षणात याची नोंद केली होती. ज्या कालावधीत त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली, त्याचा त्यांनी उल्लेख केला होता. त्यापैकी पहिलं होतं कोविड आणि दुसरं होतं लस्ट स्टोरीज. लस्ट स्टोरीजमुळे जवळपास 50 ते 55 टक्क्यांनी त्यांची विक्री वाढली होती. कारण लोक ‘कियारा अडवाणी वायब्रेटर’, ‘कियारा अडवाणी सेक्स टॉइज’ असं गुगलवर सर्च करू लागले होते.”

निर्मात्यांची प्रतिक्रिया

“माझ्या मते, जर लोकांच्या आणि विशेषकरून महिलांच्या आयुष्यात आम्ही आनंद आणत असू तर ही चांगलीच गोष्ट आहे. तुमच्या लस्ट स्टोरीजने आमच्या व्यवसायासाठी काय काम केलंय, याची तुम्हाला कल्पनाही नाही, असं त्या वेबसाइटने सांगितलं होतं. ही गोष्ट आणि या बदलाचा उल्लेख मला माझ्या बायोडेटामध्ये करावा लागेल, असा मी विचार केला (हसतात). कारण एखाद्या चित्रपटाचा असादेखील परिणाम होऊ शकतो याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. चित्रपटांमध्ये फॅशनवर परिणाम होऊ शकतो, पण वायब्रेटरचाही परिणाम जाणवेल असा कधीच मी विचार केला नव्हता”, असं सोमेन मिश्रा पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे ‘लस्ट स्टोरीज’मधील भूमिकेसाठी कियाराच्या आधी अभिनेत्री क्रिती सनॉनला ऑफर देण्यात आली होती. मात्र क्रितीने आईचं कारण सांगत या भूमिकेला नकार दिला होता. खुद्द करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये याचा खुलासा केला होता.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.