कोणीतरी दुसरा घेऊन गेला आणि हे दोघे… सलीम खान यांनी ऐश्वर्या रायवरुन सलमान-विवेक केली होती टिंगल
एका जुन्या मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान, विवेक आणि ऐश्वर्या यांच्याबाबत खूप मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी थेट ऐश्वर्याचा उल्लेख करत सलमान खान आणि विवेक ओबेरॉयची टिंगल केली होती. नेमकं ते काय म्हणाले होते चला जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय कधीही एकत्र येऊ शकले नाहीत, याचे भाईजानच्या चाहत्यांना आजही खूप दु:ख आहे. बी-टाऊनमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकेकाळी सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे होते. आज ते दोघे आपापल्या आयुष्यात पुढे गेले असले तरी त्यांच्याविषयी चर्चा कमी झालेल्या नाहीत. सलमान खान अविवाहित राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ऐश्वर्या राय असल्याचे म्हटले जाते. आजही जेव्हा बी-टाऊनच्या पार्टीत हे एक्स कपल एकाच छताखाली दिसते, तेव्हा चर्चांना उधाण येते. ऐश्वर्यानंतर सलमानच्या आयुष्यात काही मुली आल्या, पण गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली नाही. सलमानचे वडील सलीम खान यांनी सलमान, ऐश्वर्या आणि विवेक ओबेरॉय यांच्याबाबत अशी गोष्ट सांगितली होती, जी खूप चर्चेत राहिली.
काय म्हणाले होते सलीम खान?
एका जुन्या मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान, विवेक आणि ऐश्वर्या यांच्याबाबत मोठी गोष्ट सांगितली होती. यापूर्वी त्यांनी सलमानच्या आयुष्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या, ज्यात ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील भांडणाचाही समावेश होता. त्या वेळी सलीम खान म्हणाले होते की, भावनिक काळातून जाणे खूप कठीण असते. सलमान आणि विवेक यांच्या भांडणावर ते म्हणाले होते की, त्यांना एक दिवस याची जाणीव होईल की, किती छोट्या गोष्टीवर हे सर्व घडलं. सलीम पुढे म्हणाले की, “कोणीतरी दुसरा घेऊन गेला, कोणीतरी येऊन घेऊन निघून गेला आणि हे दोघे तिथेच राहिले.”
वाचा: नणंदेसोबत बायकोचे रोमँटिक चॅट, नवऱ्याला समजताच… 7 वर्षांचे नात्यात नको ते घडलं
ऐश्वर्याचे सलमान-विवेक यांच्याशी संबंध कसे बिघडले?
त्या काळात सलमानचे ऐश्वर्याशी संबंध पूर्णपणे तुटले होते. ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात ऐश्वर्याची विवेकशी भेट झाली आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली. सलमानच्या रागाच्या समस्येमुळे ऐश्वर्या त्रस्त झाली होती आणि तिने त्याच्याशी सर्व संबंध तोडले होते. 2003 मध्ये जेव्हा विवेकने एका पत्रकार परिषदेत ऐश्वर्या रायबद्दलच्या आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली, तेव्हा प्रकरण खूपच बिघडले. विवेकने उघडपणे सांगितले होते की, सलमान त्यांना आणि ऐश्वर्याला त्रास देत आहे आणि धमक्या देत होता, पण सलमानवर हे आरोप उलट विवेकवरच भारी पडले. त्यानंतर सलमानने विवेकला फोनवर धमकी दिली आणि विवेकने याचा खुलासा केला, त्यामुळे प्रकरण आणखी बिघडले. एका कार्यक्रमात विवेकने कान धरून सलमानची माफी मागितली होती. पण सलीम खान यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट मत मांडले होते.
