‘इंशाअल्लाह’ मध्ये सलमान आणि आलियाचा पहिल्यांदाच एकत्र

‘इंशाअल्लाह’ मध्ये सलमान आणि आलियाचा पहिल्यांदाच एकत्र

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान आणि बॉलिवूडची स्टुडंट आलिया भट्ट आता मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या ‘इंशाअल्लाह’ या सिनेमात हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. सलमान आणि आलियाने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली.

सलमान खानने याबाबत ट्वीट केले. “20 वर्ष झाले. मात्र, मला आनंद आहे की शेवटी संजय लीला भन्साळी आणि मी ‘इंशाअल्लाह’ हा सिनेमा करतो आहे. आलिया सोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. इंशाअल्लाह आम्हाला या प्रवासासाठी आशीर्वाद मिळतील.”

आलियानेही याबाबतचा आनंद ट्विटरवर शेअर केला. “मी पहिल्यांदा संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयात गेली, तेव्हा मी 9 वर्षांची होती. तेव्हा मी घाबरलेली होती, मी त्यांच्या पुढच्या चित्रपटात करण्यासाठी प्रार्थनाही केली होती. मला यासाठी खूप प्रतिक्षा करावी लागली आहे.”

“लोक म्हणतात की, डोळे उघडून स्वप्न बघा आणि मी तेच केलं. ‘इंशाअल्लाह’ नावाच्या या सुंदर प्रवासावर जाण्यासाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही”, असे ट्वीट करत आलियाने आपला आनंद व्यक्त केला.

‘इंशाअल्लाह’ या सिनेमात आलिया आणि सलमान खान रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे आलिया आणि सलमानला एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. या सिनेमाचं शुटिंग लवकरच सुरु होणार आहे.

विशेष म्हणजे सलमान खान हा 53 वर्षांचा आहे आणि आलिया सध्या 26 वर्षांची आहे. सलमान खान आणि संजय लीला भन्साळीने 20 वर्षांआधी ‘हम दिल दे चुके सनम’ हा सिनेमा केला होता. त्यानंतर आता 20 वर्षांनी संजय आणि सलमान पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

Published On - 9:11 am, Wed, 20 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI