AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता दीदींचं आयकॉनिक गाणं गाताना सलमान भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हे गाण गात असताना सलमान अधिक भावूक झाला असल्याचे सुध्दा पाहायला मिळत आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो त्याच्या चाहत्यांना अधिक आवडला आहे.

लता दीदींचं आयकॉनिक गाणं गाताना सलमान भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
गाण गात असताना सलमान खान
| Updated on: Feb 13, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई – लता दीदींनी (lata mangeshkar) मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात (breach candy hospital) अखेर श्वास घेतला, त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना हादरा बसला. अधिक धक्का बसला तो सेलिब्रिटींना कारण त्यांचे आणि लता दीदींचे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांच्या अनेक चित्रपटातील गाण्यांना लता दीदींचा आवाज आहे. लता दीदींच्या आवाजामुळे अनेक गाणी हीट झाली आहेत. त्यामुळे प्रत्येक सेलिब्रिटीकडून (celibrity) त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. लता दीदींचं निधन झाल्याची वार्ता अवघ्या देशात झपाट्याने पसरली. त्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रध्दांजली अर्पण केली. बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खानने (actor salman khan) सुध्दा दीदींचं गाणं गात श्रध्दांजली वाहिली आहे. सलमानचा तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने गायलं हे गाण

लता दीदींच्या निधनानंतर त्यांची अनेक अजरामर गाणी आपल्या कानावर पडली, तसेच मेरी आवाज ही मेरी पेहचान है हे वाक्य अनेकांच्या सोशल मीडियावर आणि स्टेटसला पाहायला मिळालं. सलमानने त्यांचं ऑयकॉनिक ‘गाण लग जा गले…’ हे गात त्यांना अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे. हे गाण गात असताना सलमान अधिक भावूक झाला असल्याचे सुध्दा पाहायला मिळत आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो त्याच्या चाहत्यांना अधिक आवडला आहे. तसेच अनेकानी तो शेअर देखील केल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यानंतर त्याने दीदींसारख ‘कोण नव्हतं आणि कोणी होईल’ लिहीलं आहे.

लता मंगेशकरांच्या अंतिम दर्शनासाठी मान्यवर उपस्थित

एक आठवड्यापुर्वी लता मंगेशकरांची जगाचा निरोप घेतला. लता दीदींना कोरोना झाल्याने अटक केली होती. तिथं त्याच्यावर उपचार झाल्यानंतर त्या ठीक देखील झाल्या होत्या असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर अचानक त्यांना श्वसन घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यांच्यावरती अंत्यसंस्कार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात करण्यात आले. अंत्यसंस्काराच्यावेळी देशातील मान्यवर मंडळी त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क मैदानात उपस्थित होती. सलमानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्याने गायलेलं गाण हे आयकॉनिक आहे. तसेच सलमान खानच्या आतापर्यंत अनेक चित्रपटांसाठी लता दीदींनी गाणी सुध्दा गायली आहेत. काही चित्रपट हे गाण्यामुळे चालले आहेत.

‘गहराईयाँ’ चित्रपटाचं शुटिंग झालं टुमदार घरात, एका रात्रीचं भाडं ऐकून तुमचा होश उडेल

लता मंगेशकरांचा घसा कधीच खवखवत नव्हता,अभिनेत्री बिंदू म्हणतात, ‘गोळ्या खायच्या’; कोणती गोळी खात होत्या ?

शरद कपूरने केलं सहकलाकाराचं काम, वाट्याला विलनचे रोल, आता व्यवसाय तेजीत

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.