
बॉलिवूडचे सदाबहार सुपरस्टार धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सोमवारी विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड जमलं होतं. सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. दरम्यान ‘बिग बॉस 19’ च्या फिनालेमध्ये धर्मेंद्र यांचा व्हिडीओ लावताच सलमान खान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
धर्मेंद्र आणि बिग बॉस यांचे एक खास नाते होते.
धर्मेंद्र आणि बिग बॉस यांचे एक खास नाते होते. सलमान खान हा त्यांचा आवडता होस्ट होता. धर्मेंद्र आणि सलमान खान यांचे नाते बिग बॉसच्या मंचापुरते मर्यादित नव्हते तर ते त्याच्यासाठी वडिलांच्या जागी होते. धर्मेंद्र यांनी बिग बॉसच्या मंचावर सलमान खानला वारंवार त्यांचा तिसरा मुलगा म्हणून संबोधले होते. त्यांनी सांगितले की त्यांना सलमान खानमध्ये त्यांच्या स्वतःच्या “रंगीत” आणि भावनिक स्वभावाची झलक दिसते. धर्मेंद्र आणि सलमान यांचे नाते खूप घट्ट होते. जेव्हा धर्मेंद्र सलमानच्या बिग बॉसच्या मंचावर जेव्हा जेव्हा आले होते तेव्हा बिग बॉसच्या मंचावर चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे आणि सलमानच्या सूत्रसंचालनामुळे आनंदित होऊन, धर्मेंद्र यांनी सलमानला परत येण्याचे वचन दिले होते. चाहत्यांना आशा होती की तो बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनाले किंवा विशेष भागात दिसतील, सलमानची देखील तिच इच्छा होतीय परंतु वयाच्या 89 व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने हे वचन अपूर्ण राहिले.
सलमान खानला त्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हते
धर्मेंद्र यांची बिग बॉसच्या मंचावर असलेली आठवण पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी सलमान खानने आणि धर्मेंद्र यांनी बिग बॉसच्या सेटवर घालवलेल्या आनंदी क्षणांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. त्यामध्ये धर्मेंद्र जेव्हा जेव्हा बिग बॉसच्या मंचावर आले होते ते काही क्षण दाखवण्यात आले. सलमान खान आणि धर्मेंद्रचे अनेक फोटो, व्हिडीओ देखील दाखवण्यात आले, या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांनी सलमान खानला मिठी मारतानाचा क्षणही होता. हे सर्व पाहून सलमान खानला त्याच्या डोळ्यातील पाणी मात्र लपवता आले नाही. सलमान खान धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच्या डोळ्यातील पाणी थांबतच नव्हते. दरम्यान सलमानसोबतच इतर उपस्थित स्पर्धकही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
सलमान खानने धर्मेंद्र यांचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यासारखा दुसरा कोणताही अभिनेता नाही
सलमान खानने धर्मेंद्र यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच सलमान खानने धर्मेंद्र यांचे कौतुक करताना म्हटले की त्यांच्यासारखा दुसरा कोणताही अभिनेता नाही. त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने असेही म्हटले की त्याने त्याच्या कारकिर्दीत फक्त धर्मेंद्र यांनाच फॉलो केलं आहे. हे सर्व बोलत असताना सलमान खानच्या डोळ्यातील पाणी मात्र थांबत नव्हते.