AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 19 Winner Live Update : या स्पर्धकाच्या गळ्यात बिग बॉस 19 च्या विजेतेपदाची माळ..

| Updated on: Dec 07, 2025 | 11:47 PM
Share

Bigg Boss Hindi 19 Grand Finale LIVE Updates : बिग बॉस सीजन 19 बद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. बिग बॉस 19 ला त्यांचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाली आहेत. त्यापैकी एकजण बिग बॉस 19 चा विजेता असेल. काही वेळातच ग्रॅंड फिनालेला सुरूवात होईल.

Bigg Boss 19 Winner Live Update : या स्पर्धकाच्या गळ्यात बिग बॉस 19 च्या विजेतेपदाची माळ..
Bigg boss

LIVE NEWS & UPDATES

  • 07 Dec 2025 11:47 PM (IST)

    Bigg Boss 19 Winner : गाैरव खन्ना बिग बॉस 19 चा विजेता..

    बिग बॉस 19 चा फिनाले झाला असून गाैरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता झाला आहे. फरहाना भट्ट आणि गाैरव खन्ना बिग बॉस 19 चे टॉप 2 फायनलिस्ट ठरले होते. अखेर विजेतेपदाची माळ गाैरवच्या गळ्यात पडली.

  • 07 Dec 2025 11:26 PM (IST)

    गौरव खन्ना आणि फरहाना टॉप 2 मध्ये, वोटिंग सुरू

    बिग बॉस 19 ला गाैरव खन्ना आणि फरहाना असे दोन टॉप फायनलिस्ट मिळाले असून दोघांपैकी एकजण विजेता होईल. वोटिंग लाईन 10 मिनिटांसाठी सुरू झाल्या आहेत. त्यानंतर बिग बॉस 19 चा विजेता जाहीर होईल.

  • 07 Dec 2025 11:24 PM (IST)

    Bigg Boss 19 : प्रणित मोरे बिग बॉस 19 च्या घरातून बाहेर…

    बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. गाैरव खन्ना आणि फरहाना खान हे दोन फायनलिस्ट बिग बॉस 19 मिळाली आहेत.

  • 07 Dec 2025 11:17 PM (IST)

    बिग बॉस 19 च्या फिनालेमध्ये धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धाजंली..

    बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून यावेळी अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी सलमान खान भावूक झाल्याचे बघायला मिळाले. फक्त भावूकच नाही तर सलमान खान सेटवरच ढसाढसा रडला…

  • 07 Dec 2025 11:06 PM (IST)

    Bigg Boss 19 grand finale : हे आहेत बिग बॉस 19 चे टॉप 3 फायनलिस्ट…

    बिग बॉस 19 चा फिनाले सुरू असून आता बिग बॉसला टॉप 3 फायनलिस्ट मिळाले आहेत. गाैरव खन्ना, फरहाना खान आणि प्रणित मोरे बिग बॉस 19 चे फायनलिस्ट ठरले आहेत.

  • 07 Dec 2025 11:01 PM (IST)

    तान्या मित्तल बिग बॉस 19 च्या घराबाहेर…

    तान्या मित्तल हिला मोठा झटका बसला असून ती बिग बॉस 19 च्या घराबाहेर पडली आहे. फिनालेच्या दिवशीही सलमान खान तान्याचा क्लास लावताना दिसला.

  • 07 Dec 2025 10:43 PM (IST)

    Bigg Boss 19 grand finale : सलमान खानने व्यक्त केली मनातील खंत…

    सनी लिओनी आणि करण कुंद्रा “स्प्लिट्सव्हिला 16: च्या प्रमोशनसाठी आले होते. त्यांनी अशनूर आणि अभिषेक यांना स्टेजवर आमंत्रित केले. अशनून सलमानला सांगतो, मला चुकीच्या मुली मिळाल्या आहेत..

  • 07 Dec 2025 10:24 PM (IST)

    Bigg Boss 19 grand finale live : अमान मलिकला बाहेरचा रस्ता

    बिग बॉस 19 च्या घरातून अमान मलिक हा बाहेर गेला आहे. आता बिग बॉसला त्यांचे टॉप 4 फायनलिस्ट मिळाले आहेत.

  • 07 Dec 2025 10:19 PM (IST)

    प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून पडला बाहेर…

    बिग बॉस 19 च्या ग्रॅंड फिनालेला सुरूवात झाली असून एक एक स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर पडत आहेत. रिपोर्टनुसार, प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.

  • 07 Dec 2025 09:59 PM (IST)

    Bigg boss : सलमान खानला आठवल्या जु्न्या गोष्टी..

    सलमान खानने विचारला थेट प्रणित मोरे याच्या आई वडिलांना प्रश्न. सलमान खान म्हणाला कधी याला मारण्याची इच्छा झाली नाही का? जुन्या आठवणी काढत सलमान खान म्हणतो की, माझ्याबद्दल कशाला बोलतो हा.. त्यावर बोलताना प्रणितची आई म्हणाली, सर जुन्या गोष्टी आहेत, माती टाका…

  • 07 Dec 2025 09:47 PM (IST)

    मालती चहर आणि शहवाज यांच्यात वाद

    बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात असून मालती चहर आणि शहवाज यांच्यात वाद सुरू झाला असून मालती हिने सलमान खान याच्याकडे तक्रार केला.

  • 07 Dec 2025 09:39 PM (IST)

    प्रणितला या क्रिकेटच्या बहिणीसोबत कॉफी डेटवर जाण्याचा सलमान खानचा सल्ला…

    बिग बॉस 19 च्या घरात दिपक चहर याची बहीण मालती आणि प्रणित मोरे यांची चांगली मैत्री बघायला मिळाली. मात्र, मालती घरातून बाहेर जाताना प्रणितला अजिबातच बोलली नाही. यावरून सलमान खान बोलताना दिसला.

  • 07 Dec 2025 09:28 PM (IST)

    Bigg Boss 19 : सलमान खानने प्रणित मोरेसोबत साधला मराठीत संवाद…

    बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून यावेळी सलमान खान प्रणित मोरे याच्यासोबत मराठीत संवाद साधताना दिसला. तू बाहेर ये मी तुझी वाट पाहत आहे, असे सलमान खान याने म्हटले.

  • 07 Dec 2025 09:24 PM (IST)

    Bigg Boss 19 Tanya Mittal : तान्या मित्तलला फिनालेलाही सलमान खानने झापले…

    बिग बॉस 19 चा आज फिनाले असून फिनालेच्या दिवशीही सलमान खान तान्या मित्तलचा क्लास लावताना दिसला. सर्वजण तुलाच टार्गेट करतात असे तुला वाटते म्हणताना सलमान खान दिला.

  • 07 Dec 2025 09:17 PM (IST)

    बिग बॉस 19 च्या टॉप 5 फायनलिस्टची धमाकेदार डान्स

    बिग बॉस 19 चे टॉप 5 फायनलिस्ट धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. गाैरव खन्ना याच्या डान्सने सुरूवात झाली.

  • 07 Dec 2025 09:13 PM (IST)

    Bigg Boss 19 : सलमान खानची धासू एंट्री

    बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून सलमान खान याची धमाकेदार एंट्री झाली आहे.

  • 07 Dec 2025 09:07 PM (IST)

    प्रणित मोरेला मालती चहरची आठवण

    बिग बॉस 19 च्या आपल्या आवडत्या कोपऱ्यात जाऊन प्रणित मोरे भावूक झाला. यादरम्यान त्याने मालती चहर हिचे देखील नाव घेतले.

  • 07 Dec 2025 09:04 PM (IST)

    Bigg Boss 19 Live : बिग बॉस 19 च्या निर्मात्यांची पहिली पसंती गाैरव खन्ना

    बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात झाली असून घरातील आवडत्या कोपऱ्यात आठवणीसाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी पहिली संधी गाैरव खन्नाला दिली.

  • 07 Dec 2025 09:00 PM (IST)

    काही सेकंदात बिग बॉस 19 च्या फिनालेला सुरूवात होणार

    बिग बॉस 19 च्या फिनालेची वाट गेल्या अनेक दिवसांपासून चाहते बघत होते. शेवटी तो क्षण आला असून बिग बॉस 19 च्या फिनालेला काही सेकंदात सुरूवात होईल.

  • 07 Dec 2025 08:47 PM (IST)

    BIGG BOSS 19 Grand Finale LIVE Updates : सलमान खान दिसणार धमाकेदार लूकमध्ये…

    बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा बिग बॉस 19 ला होस्ट करत आहे. सलमान खान ग्रॅंड फिनालेमध्ये दबंग स्टाईल येणार आहे. माधुरी दीक्षित देखील बिग बॉसच्या मंचावर दिसेल.

  • 07 Dec 2025 08:40 PM (IST)

    बिग बॉसच्या घरात धमाकेदार डान्स

  • 07 Dec 2025 08:23 PM (IST)

    Bigg Boss 19 : अमाल मलिक ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर?

    बिग बॉस 19 चा ग्रँड फिनाले रात्री 9 वाजता सुरू होईल. त्याआधी, द खबरी ऑन एक्स ने दावा केला आहे की अमाल मलिक ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हा खरोखरच मोठा धक्का म्हणावा लागेल.

  • 07 Dec 2025 08:20 PM (IST)

    Bigg Boss 19 grand finale live : गाैरव खन्ना याच्यासाठी सेलिब्रिटी मैदानात

    ईशा मालवीयाने गौरव खन्ना यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. संपूर्ण हंगामात प्रतिष्ठा, आदर आणि प्रामाणिकपणाने खेळणारा माणूस विजयास पात्र आहे, असे तिने म्हटले.

  • 07 Dec 2025 07:46 PM (IST)

    प्रणित मोरे याला फिनालेच्या अगोदरच थेट धक्का, वोटिंगमध्ये…

    बिग बॉस 19 चा आज ग्रॅंड फिनाले आहे. 9 वाजता फिनालेला सुरूवात होईल. त्यापूर्वी वोटिंगबद्दल मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. प्रणित मोरे वोटिंगमध्ये मागे पडल्याचे सांगितले जात आहे.

  • 07 Dec 2025 07:38 PM (IST)

    नेहा चुडासमा फरहाना भट्ट्च्या समर्थनार्थ मैदानात

    नेहा चुडासमाने फरहाना भट्टच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून ती लोकांना फरहानाला वोटिंग करण्याचे आवाहन करताना दिसली.

  • 07 Dec 2025 07:31 PM (IST)

    धक-धक गर्ल माधुरी दीक्षित बिग बॉसच्या मंचावर दिसणार

    माधुरी दीक्षित तिच्या मिसेस देशपांडे च्या प्रमोशनसाठी बिग बॉस 19 च्या फिनालेला उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे खास लूकमध्ये यावेळी माधुरी दीक्षित दिसेल.

  • 07 Dec 2025 07:26 PM (IST)

    Bigg Boss 19 Prize Money : बिग बॉसच्या विजेत्याला मिळणार तब्बल इतके लाख…

    बिग बॉस 19 च्या बक्षीस रकमेसह दरवर्षी निर्माते बिग बॉस विजेत्यांना ट्रॉफी देतात. या सीझनचा विजेता जो कोणी जिंकेल त्याला ट्रॉफी आणि 50 लाख रुपये मिळणार आहेत.

  • 07 Dec 2025 07:18 PM (IST)

    Bigg Boss 19 Grand Finale Live : एक्सवर गाैरव खन्ना याचे वारे

    चाहत्यांनी केला गौरव खन्ना याच्या नावाचा जयजयकार. गौरव खन्ना BB19 मध्ये धाडसी मनाने गेला. प्रत्येक अडचणीने त्याला अधिक मजबूत बनवले, प्रत्येक क्षणाने त्याला चमकवले. बिग बॉसचा विजेता गाैरव खन्ना असे लोक एक्सवर पोस्ट करत आहेत.

  • 07 Dec 2025 07:02 PM (IST)

    ओटीटी आणि टीव्हीवर एकाचवेळी सुरू होणार बिग बॉस 19 चा फिनाले

    ग्रँड फिनालेचा एपिसोड टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी प्रसारित होणार आहे. सुरूवातीला ओटीटीवर 9 ला आणि टीव्हीवर 10.30 ला सुरूवात होणार असे सांगितले जात होते. मात्र, स्पष्ट झाले आहे की, एकाच वेळात सुरूवात फिनालेला सुरूवात होईल.

  • 07 Dec 2025 06:50 PM (IST)

    लॉरेन्स बिश्नोई टोळीची फिनालेपूर्वी धक्कादायक धमकी

    बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग परफॉर्म करणार आहे. मात्र, फिनालेपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याला धमकी दिल्याचे वृत्त आहे. बिश्नोई टोळीने त्याला सलमानसोबत काम करू नये नाही तर वाईट परिणांमा सामोरे जावे लागेल अशी धमकी दिली.

  • 07 Dec 2025 06:40 PM (IST)

    प्रणित मोरे याला सर्वात मोठा धक्का, थेट बिग बॉस 19 मधून…

    वोटिंग ट्रेंड आणि सोशल मीडिया ट्रेंड ट्रॅकर्सनुसार, गौरव खन्ना सध्या आघाडीवर आहे. अमाल मलिक दुसऱ्या स्थानावर आहे. फरहाना भट्ट तिसऱ्या स्थानावर आहे. तर प्रणित मोरे शेवटच्या स्थानावर असल्याची माहिती मिळतंय.

  • 07 Dec 2025 05:45 PM (IST)

    वोटिंगचा ट्रेंडनुसार गाैरव खन्ना आहे टॉपमध्ये…

    वोटिंगचा ट्रेंड आणि सोशल मीडियावरील ट्रेंडनुसार, गाैरव खन्ना हा आघाडीवर आहे. अमाल मलिक दुसऱ्या स्थानावर आहे. फरहाना भट्ट तिसऱ्या स्थानावर आहे. तान्या मित्तल आणि प्रणित मोरे पिछाडीवर आहेत.

  • 07 Dec 2025 05:33 PM (IST)

    फरहाना भट्ट दिसली जबरदस्त लूकमध्ये

    फरहाना भट्टने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये बिग बॉस 19 च्या मंचावर लक्ष वेधून घेतले. फरहाना भट्टचा लूक चाहत्यांना आवडताना दिसत आहे.

  • 07 Dec 2025 05:15 PM (IST)

    Bigg Boss : फिनालेच्या मंचावर अमान मलिक याने लावली आग

    अमाल मलिक बिग बॉस 19 च्या ग्रँड फिनालेमध्ये ग्लॅमर भरण्यास सज्ज आहे. धमाकेदार लूक अमान मलिक याचा बघायला मिळतोय.

  • 07 Dec 2025 05:12 PM (IST)

    Bigg Boss 19 : गौरव खन्ना यांचा बिग बॉसच्या मंचावर धमाकेदार डान्स

    गाैरव खन्ना बिग बॉस 19 चा टॉप 5 फायनलिस्टपैकी एक आहे. गाैरव खन्ना हाच विजेता होईल, असे सांगितले जात आहे. गाैरव खन्ना याचा फिनालेदरम्यान धमाकेदार डान्स होणार असून त्याचे फोटो व्हायरल झाली आहेत.

  • 07 Dec 2025 05:06 PM (IST)

    अभिनेता कार्तिक आर्यन येणार बिग बॉसच्या मंचावर

    अभिनेता कार्तिक आर्यन हा देखील बिग बॉस 19 च्या मंचावर येणार आहे. “तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी” च्या प्रमोशनसाठी शोमध्ये येणार आहे. यावेळी तो धमाल करताना दिसले.

  • 07 Dec 2025 04:58 PM (IST)

    रात्री 9 ला होणार बिग बॉस 19 च्या ग्रॅंड फिनालेला सुरूवात

    रात्री 9 वाजता प्रसारित होणाऱ्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण आधीच सुरू झाले आहे. टॉप 5 फायनलिस्टमध्ये जोरदार टक्कर होताना दिसले. चाहते आपल्या आवडत्या स्टारला विजेता करण्यासाठी सोशल मीडियावर सपोर्ट करत आहेत.

  • 07 Dec 2025 04:57 PM (IST)

    Bigg Boss 19 : अशनूर बिग बॉस 19 च्या सेटवर

    अशनूर कौर अंतिम भागात परफॉर्म करताना दिसेल. अशनूर बिग बॉस 19 च्या सेटवर दिसली होती. फिनालेच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.

बिग बॉस 19 ( Bigg Boss 19) ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून हे सीजन चर्चेत आहे. सुरूवातीच्या दिवसांपासूनच घरात मोठी हंगामे होताना दिसली. शेवटी आता बिग बॉस 19 ला त्यांची टॉप 5 फायनलिस्ट मिळाली आहेत. ग्रॅंड फिनाले (Grand Finale) ला अवघ्या काही तासात सुरूवात होईल. आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता करण्यासाठी चाहत्यांकडून प्रयत्न केली जात आहेत. सलमान खान विजेत्याच्या नावाची घोषणा करेल. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह फिनालेबद्दल बघायला मिळत आहे. प्रणित मोरे, गौरव खन्ना, अमान मलिक, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल हे टॉपमध्ये पोहोचले असून यांच्यापैकी एकजण बिग बॉसचा विजेता होईल. बॉलिवूडचे अनेक कलाकार फिनालेमध्ये पोहोचणार आहेत. टॉप 5 फायनलिस्टचे खास डान्स होतील. सलमान खान (Salman khan) रात्री बाराच्यादरम्यान बिग बॉस 19 च्या विजेत्याच्या नावाची घोषणा करेल.

Published On - Dec 07,2025 4:55 PM

Follow us
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....