AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जिवंत राहायचे असेल तर…”, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी

सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत.

जिवंत राहायचे असेल तर..., सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकी
Salman Khan, lawrence bishnoi
| Updated on: Nov 05, 2024 | 10:40 AM
Share

Salman Khan Another Threat : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ संपता संपत नाही. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. सलमान खानने माफी मागावी, अन्यथा त्याला जीवे मारण्यात येईल, असा धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या भावाने सलमान खानला ही धमकी दिली आहे.

“मंदिरात येऊन माफी मागावी, अन्यथा…”

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री एक धमकीचा फोन आला होता. यावेळी धमकी देणाऱ्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीवजा मेसेज दिला आहे. मी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ बोलत आहे, असा दावा त्याने केला आहे. जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर त्याने आमच्या मंदिरात येऊन माफी मागावी, नाहीतर पाच कोटी रुपये द्यावे. जर त्याने हे केले नाही तर आम्ही त्याला जीवे मारु. आमची गँग आजही सक्रिय आहे, असे धमकी देणाऱ्याने म्हटले आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळालेल्या धमकीच्या मेसेजनंतर वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे सलमान खानला गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा मेसेज करणाऱ्या व्यक्तीचा मुंबई पोलीस शोध घेत आहेत. तसेच याप्रकरणाचा तपासही सुरु आहे.

सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर 

दरम्यान, अभिनेता सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. सलमान खानने 1998 मध्ये काळविटाची शिकार केली होती, असा आरोप आहे. बिश्नोई समाज हा काळविटाची पूजा करतो. यामुळे लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे. सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी गोळीबार झाला होता.

बाबा सिद्दीकींची हत्या, सलमानची सुरक्षा वाढवली

यानंतर दसऱ्याच्या दिवशी सलमान खानच्या निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या दोन्ही घटनांमागे बिश्नोई टोळीचा हात असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. यानंतरही सतत सलमान खानला धमक्या मिळत आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?