Salman Khan | ‘त्या’ व्हिडीओमुळे सलमान खान याचा संताप, बिग बाॅस ओटीटीला केले रामराम?, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण
बिग बाॅस ओटीटी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस ओटीटी 2 ला सलमान खान हा होस्ट करताना दिसतोय. सलमान खान याने काही दिवसांपूर्वीच आकांक्षा पुरी हिचा चांगलाच क्लास लावला होता. आकांक्षा हिने थेट कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केले होते.

मुंबई : बिग बाॅस ओटीटी 2 धमाल करताना दिसत आहे. सध्या बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss OTT 2) चर्चेत देखील आहे. नुकताच मोठा धमाका हा बिग बाॅसच्या घरात होताना दिसला. काही दिवसांपूर्वीच आकांक्षा पुरी हिने चक्क बिग बाॅसच्या घरात असताना थेट कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. अनेकांनी यानंतर आकांक्षा पुरी (Akanksha Puri) हिला जोरदार टार्गेट करण्यास देखील सुरूवात केली. नेटकरी फक्त इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी थेट या वादामध्ये सलमान खान (Salman Khan) याला देखील ओढले. मात्र, घरामध्ये घडलेल्या या सर्व प्रकारावर सलमान खान हा देखील संताप व्यक्त करताना दिसला. अनेकांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांना देखील खडेबोल सुनावले.
या आठवड्यामध्ये सलमान खान हा शो होस्ट करताना दिसला नाही. सलमान खान हा होस्ट करताना दिसला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. अनेकांनी तर थेट सलमान खान याने शो सोडल्याचे देखील बोलले. सतत होत असलेल्या चर्चांमुळे सलमान खान याचे चाहते देखील टेन्शनमध्ये आले. कारण एका व्हिडीओमुळेच सलमान खान याने शो सोडल्याचा दावा केला जात होता.
यापूर्वीच्या विकेंडच्या वारमधील एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का देखील बसला. कारण या व्हिडीओमध्ये चक्क बिग बाॅस ओटीटी 2 च्या सेटवर सलमान खान हा घरातील सदस्यांना बोलत असताना त्याच्या हातामध्ये सिगारेट दिसली.
हा व्हिडीओ देखीस तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे लोक सतत सलमान खान याला टार्गेट करत होते. कारण व्हिडीओमध्ये सलमान खान याच्या हातामध्ये स्पष्टपणे सिगारेट दिसत होती. निर्मात्यांकडून हा व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने सलमान खान हा बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांवर नाराज झाल्याची चर्चा रंगली.
इतकेच नाही तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळेच सलमान खान याने थेट शो सोडल्याचे बोलले जात आहे. आता नुकताच याबद्दलचे मोठे आणि महत्वाचे अपडेट हे पुढे आले आहे. सलमान खान याने बाॅस ओटीटी 2 सोडले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सलमान खान हाच शो होस्ट करताना दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.
