AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोहैलच्या बर्थडे पार्टीनंतर पापाराझींवर भडकला सलमान; रागाच्या भरात म्हणाला ‘मागे व्हा सर्वांनी..’

अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सोहैल खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला सलमान खानचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. पार्टीनंतर आई सलमा खान यांना तो जेव्हा गाडीपर्यंत सोडायला आला, तेव्हा तो पापाराझींवर भडकताना दिसला.

सोहैलच्या बर्थडे पार्टीनंतर पापाराझींवर भडकला सलमान; रागाच्या भरात म्हणाला 'मागे व्हा सर्वांनी..'
Salman Khan Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 20, 2023 | 12:45 PM
Share

मुंबई : 20 डिसेंबर 2023 | अभिनेता सोहैल खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त खान कुटुंबीयांकडून मंगळवारी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये सलमान खानसह संपूर्ण परिवार उपस्थित होता. पार्टीतून बाहेर पडताना सलमान त्याची आई सलमा खान यांची पायऱ्या उतरण्यासाठी मदत करत होता. त्याचवेळी तो पुढे जाऊन पापाराझी आणि फोटोग्राफर्सवर भडकताना दिसला. ‘कारसमोर मागे व्हा’, असं म्हणत तो त्यांच्यावर रागावताना दिसून आला. सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

पार्टीतून बाहेर पडल्यानंतर सलमानने त्याच्या आईचा हात पकडून त्यांना कारपर्यंत नेलं. पायऱ्यांवरून उतरताना त्याने आईचा हात पकडला होता. त्यानंतर आईला कारमध्ये बसवण्याआधी तो पापाराझींवर भडकताना दिसला. सोहैल खानच्या पार्टीला सलमान आणि त्याच्या आईसोबतच वडील सलीम खान, त्यांची दुसरी पत्नी हेलन, भाऊ अरबाज खान, बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा, अर्पिता-आयुषची मुलं अहिल आणि आयात शर्मा, रितेश देशमुख, जिनिलिया देशमुख, वत्सल शेठ आणि इशिता दत्ता हेसुद्धा उपस्थित होते.

सलमानच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘बरं झालं भाई ड्राइव्ह करत नाहीये’, असं एकाने लिहिलं. तर ‘बोलायची पण गरज नव्हती, फक्त रागाने त्यांच्याकडे बघितलंस तेच पुरेसं झालं’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘टायगर 3 फ्लॉप झाल्याचा परिणाम भाईजानवर झाला आहे’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. सलमान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘टायगर 3’ हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात आतापर्यंत 466.33 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाच सलमा खान यांचा 81 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. ज्यामध्ये सलमा केक कापताना हेलन त्यांच्यासाठी ‘हॅपी बर्थडे’ गाणं गाताना दिसल्या होत्या. हेलन या सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्याआधी सलीम यांनी सुशीला चरक यांच्याशी निकाह केला होता. निकाहनंतर त्यांनी आपलं नाव बदलून सलमा खान असं ठेवलं. पाच वर्षे डेट केल्यानंतर 1964 मध्ये सलीम यांनी सुशीला यांच्याशी लग्न केलं होतं. या दोघांना सलमान, सोहैल, अरबाज आणि अलवीरा ही चार मुलं आहेत. तर अर्पिता खानला त्यांनी दत्तक घेतलं.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.