AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman khan : सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कोठडीतच उचललं टोकाचं पाऊल

अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला होता.

Salman khan : सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, कोठडीतच उचललं टोकाचं पाऊल
सलमान खान
| Updated on: May 01, 2024 | 4:09 PM
Share

अभिनेता सलमान खान याच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या गोळीबार प्रकरणातील एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. अनुज थापन असे मृत आरोपीचे नाव असून त्याने पोलिस कोठडीतच चादरीने गळफास लावून घेतला. त्याची प्रकृती गंभीर होती. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आज सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कोठडीची पाहणी करण्यास गेले असता आरोपीने गळफास घेतल्याचे समोर आले. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या शूटर्सना शस्त्र पुरवल्याचा आरोप अनुजवर होता.

14 एप्रिल, रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटधील सलमान खानच्या घरावर दोघांनी गोळीबार केला होता. बाईकवररून आलेले दोन्ही शूटर्स गोळीबार करून तातडीने फरार झाले आणि मजल दरमजल करत ते गुजरातच्या भुज येथील एका मंदिरात जाऊन लपले होते.  मुंबई पोलिस तसेच क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी कसून तपास करत दोन दिवसांच्या आत त्या शूटर्सना शोधून काढले होते. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी त्या आरोपींची नावे होती.  या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती.

चौघांना अटक

त्यानंतरही पोलिसांकडून तपास सुरूच होता. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली. एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोन्ही शूटर्सना पिस्तुल पुरवल्याप्रकरणी पोलिसांनी पंजाब येथून सोनू चंदर आणि अनुज थापन या दोघांनाही बेड्या ठोकल्या. या आरोपींपैकीच अनुज थापन याने आज पोलिस कोठडीतच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्याने चादरीने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. अखेर त्याचा मृत्यू झाला. अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करत होता, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत.

हल्ल्याआधी घराची आणि फार्महाऊसची केली होती रेकी

मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्याआधीच शूटर्सनी चार वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. एवढंच नव्हे तर त्यांनी एकदा सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसवरही पाळत ठेवली होती. मात्र बऱ्याच काळापासून सलमान फार्महाऊसवर आलाच नव्हता त्यामुळे हल्लेखोरांनी त्याच्या वांद्रे येथील घरावरच गोळीबार करण्याचा प्लान आखला. दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले पिस्तुल हे मुंबईत आल्यावर अज्ञात व्यक्तींकडून पुरवण्यात आले होते. तर खर्चासाठी लागणारे पैसेही अनोळखी व्यक्तीने दिले होते. त्याचबरोबर घर भाड्याने घेण्यासाठी अनोळखी व्यक्तीने मध्यस्थी केली होती. सलमान खानच्या घरावर गोळीबार होण्याच्या काही तास आधी शूटर्सना बंदूक पुरवण्यात आली होती. या बंदुकीचा पुरवठा 13 एप्रिलच्या रात्री वांद्रे भागात करण्यात आला आणि 14 एप्रिलच्या पहाटे दोन्ही शूटर्सनी सलमानच्या घरावर गोळीबार केला.

आरोपींना 12 गोळ्या झाडण्याचे होते आदेश

सलमानला घाबरवण्यासाठीच बिश्नोई गँगकडून आरोपींना त्याच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी देण्यात आली होती. कमीत कमी दोन मॅगझीन घरावर फायर करण्याचे टारगेट दोन्ही आरोपींना देण्यात आलं होत. 2 मॅगेझिन अर्थात 12 गोळ्या फायर करा, असे आदेश हल्लेखोरांना देण्यात आले होते. मात्र, हल्लेखोरांना 12 गोळ्या फायर करता आल्या नाहीत. दोन्ही आरोपींना कामासाठी आधी 1 लाख मिळाले होते, अशी माहिती चौकशीत समोर येत आहे. काम फत्ते झाल्यावर आरोपींना नंतर आणखी 3 लाख मिळणार होते.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र