
Salman Khan : बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणजेच अभिनेता सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर, सातासमुद्रा पार देखील फार मोठी आहे. सलमान खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण एक देशातील सरकराने सलमान खान याला दहशतवादी घोषित केलं… सलमान खान याला दहशतवादी घोषित करणारा देश दुसरा तिसरा कोणता नाही तर, पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या चौथ्या यादीत सलमान खान याचं नाव टाकण्यात आलं… पण तपास केल्यानंतर यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं आढळलं आहे… सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, या अफवांची सुरुवात एका ‘सरकारी कागदपत्रा’मुळे झाली. ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, सलमान खान याला पाकिस्तानने दहशतवाद संबंधी यादीत सामिल केलं आहे. या कागदपत्राचा स्क्रिनशॉट देखील तुफान व्हायरल झाला. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाची नोटीस असल्याचा दावा करण्यात आला होता. पण ते सर्वकाही बनावट असल्याचं सत्य समोर आलं आहे.
तपास केल्यानंतर मोठं सत्य समोर आलं, सबंधित दस्तऐवज डिडिटली तयार करण्यात आला होता… कोणत्यात सरकारी वेबसाईटवर याची पुष्टी झालेली नसल्याचं सत्य समोर आलं आहे. शिवाय कोणत्याही अधिकाऱ्याने या प्रकरणावर मौन सोडलेलं नाही. सलमान खानचे बलुचिस्तानसारख्या मुद्द्यांवर चर्चा करतानाचे जुने व्हिडिओही व्हायरल झाले होते.
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, भाईजान लवकरच ‘बॅटल ऑफ गलवान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान खान सैन्य अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेत्याने लडाखमध्ये सिनेमाची शुटिंग पूर्ण केली आहे. हा सिनेमा 2020 मध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील गलवान व्हॅलीतील संघर्षाच्या खऱ्या घटनांवर आधारित असल्याचा माहिती मिळत आहे. सध्या सलमान बिग बॉस 19 साठी देखील शुटिंग करत आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. आजही चाहते सलमान खानच्या आगामी सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.