Radhe | ओटीटीवर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरी IMDB रेटिंगमध्ये आपटला सलमान खानचा ‘राधे’, जाणून घ्या चित्रपटाची रेटिंग..

'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई' (Radhe)  चित्रपटाला रिलीज होताच, या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी ओटीटीवर विक्रम केला आहे.

Radhe | ओटीटीवर चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरी IMDB रेटिंगमध्ये आपटला सलमान खानचा ‘राधे’, जाणून घ्या चित्रपटाची रेटिंग..
राधे
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 12:07 PM

मुंबई : यंदाच्या ईदनिमित्त अर्थात 13 मे रोजी ‘दबंग’ सलमान खान (Salman Khan) याचा ‘राधे’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. ‘राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe)  चित्रपटाला रिलीज होताच, या चित्रपटाला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. सलमान खानच्या चाहत्यांनी ओटीटीवर विक्रम केला आहे आणि ‘राधे’ हा सद्य काळातला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. मात्र, दुसरीकडे आयएमडीबीवर सलमान खानच्या या चित्रपटाला खूपच खराब रेटिंग मिळाली आहे (Salman Khan Radhe movie got lowest IMDB rating).

‘राधे’ ओटीटीवर आणि चित्रपटगृहात दोन्हीकडे प्रदर्शित झाला आहे. पण, झी5 वर रिलीज होणारा राधे बहुतेक चाहत्यांनी ओटीटी वरच पाहिला आहे. यामुळेच चित्रपटाने विक्रम केला, पण आयएमडीबीने चित्रपटाला अतिशय सुमार असल्याचे सांगितले आहे.

ओटीटीवर सलमानचा दबदबा

सलमान खानचा चित्रपट ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ रिलीज झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी 5’चा सर्व्हर क्रॅश झाला. बातमीनुसार या चित्रपटाला केवळ झी 5 वर 42 लाख व्हू मिळाले आहेत. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

Imdbचे रेटिंग

इंटरनेट मूव्ही डेटाबेस म्हणजेच आयएमडीबीवर राधेला फ्लॉप म्हटले गेले आहे. आयएमडीबीवर चित्रपटाचे रेटिंग केवळ 2.0 होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला पसंती देण्यात आली असली, तरी आयएमडीबीवरील रेटिंगच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला आहे. सलमान खानच्या चित्रपटाची ही पहिलीच घटना नाही. या आधीही सलमानचे ‘टायगर जिंदा है’, ‘रेस 3’, ‘दबंग 3’ हे चित्रपटही IMDB रेटिंगवर फ्लॉप ठरले होते (Salman Khan Radhe movie got lowest IMDB rating).

सलमान खानच्या ‘राधे’ने दुबई आणि युएईमध्ये चांगली सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर चित्रपटाने तेथील चित्रपटगृहातही चांगली कमाई केली आहे. मात्र, सिनेमागृहांमध्येही केवळ 50% आसन क्षमतेसह चित्रपट पाहण्यास परवानगी आहे. त्यातही पहिल्याच दिवशी चित्रपटाने 2 कोटी 77 लाख रुपये कमावले आहेत.

190 कोटीची डील

सलमानने यापूर्वी झी स्टुडिओला हा चित्रपट 230 कोटीला विकला होता. पण जेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कंपनीने पुन्हा एकदा यावर चर्चा केली आणि सलमानला 190 कोटींमध्ये डील करण्यास सांगितले. स्वत: सलमान देखील या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याच वेळी, नंतर तो सॅटेलाईट म्हणजेच टीव्हीवर देखील प्रदर्शित होईल. ज्यामध्ये ते जाहिरातींद्वारे पैसा कमवू शकतो.

(Salman Khan Radhe movie got lowest IMDB rating)

हेही वाचा :

‘कोको’ हरवलाय, शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस! ‘मुन्ना मायकल’ फेम अभिनेत्रीची घोषणा

‘रंगीला’नंतरच्या एका वक्तव्यामुळे आमीर-राम गोपाल वर्माच्या नात्यात आले होते वितुष्ट, वाचा पुढे काय झालं…

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.