करिश्माचा ड्रेस पाहून भडकलेला सलमान, थेट शूटिंगला दिलेला नकार, म्हणाला तिचा ड्रेस…
करिश्मा कपूरचा ड्रेस पाहून भडकलेला सलमान खान. दिला होता तिच्यासोबत शूटिंग करण्यास नकार. अभिनेत्रीने दिग्दर्शकाकडे तक्रार करताच सलमान स्पष्टच सांगितलं.

करण जोहरच्या लोकप्रिय ‘कॉफी विथ करण 9’ या चॅट शोच्या अंतिम पर्वाची सुरुवात झाली आहे. पहिल्याच भागात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते चित्रपटांच्या आठवणींपर्यंत अनेक रंजक किस्से सांगितले.
‘दुल्हन हम ले जाएंगे’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक मजेदार किस्सा करिश्माने सांगितला. शूटिंगच्या वेळी तिने परिधान केलेला ड्रेस सलमानला आवडला नव्हता. हा ड्रेस खूपच लहान आणि अंगाला घट्ट बसणारा असल्याने सलमानने त्या ड्रेसमध्ये तिच्यासोबत सीन करण्यास नकार दिला होता. अखेर करिश्माला दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्याकडे तक्रार करावी लागली. डान्स करताना ड्रेस आणखी वर सरकत असल्याने आपण प्रत्येक टेकपूर्वी तिला ड्रेस खाली करण्यास सांगत होतो असे सलमानने स्पष्ट केले.
करिश्मासोबतच्या नात्याला म्हटले ‘सर्वात दीर्घ अफेअर’
शोमध्ये करण जोहरने करिश्माने सलमानसोबतच्या नात्याला ‘प्लेटॉनिक’ म्हणजेच मैत्रीपूर्ण नाते म्हटल्याचा उल्लेख केला. त्यावर सलमानने मजेशीर प्रतिक्रिया देत, ‘ती खोटं बोलत आहे. हे सर्वात जास्त काळ चाललेलं अफेअर होतं. तिने मला सोडलं आणि लग्न केलं’ असे म्हटले. त्याच्या या वक्तव्यामुळे करिश्मालाही आश्चर्याचा धक्का बसला.
लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना सलमानने हा स्वतःचा निर्णय असल्याचे सांगितले. लग्न करण्यापासून आपल्याला कोणीही रोखले नसून आपण स्वतःच हा निर्णय घेतल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच, भविष्यात आपल्याला मुलं हवी आहेत आणि आयुष्यात कधीतरी वडील होण्याची इच्छा असल्याचेही त्याने सांगितले.
फिटनेस आणि आरोग्याच्या समस्यांवर भाष्य
सलमानने आपल्या फिटनेसच्या प्रवासातील अडचणींबद्दलही मनमोकळेपणाने सांगितले. ‘सुलतान’ चित्रपटाच्या काळात दुखापतींचा त्रास सुरू झाला. डोक्याला झालेली दुखापत, हर्निया, खांदा, गुडघा आणि पाठीच्या समस्या यांसह ट्रायजेमिनल न्युराल्जिया आणि अॅन्युरिझमचा सामना करावा लागल्याचे त्याने सांगितले. मात्र, या अडचणींचा आधार घेऊन स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करायला नको होते अशी कबुलीही त्याने दिली.
स्वतःच्या आयुष्यावर बायोपिक होणार नाही!
आपल्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याबाबत विचारले असता सलमानने स्पष्ट नकार दिला. ‘माझ्या आयुष्यावर कधीही बायोपिक बनणार नाही. माझं आयुष्य माझ्यासोबतच कबरीत जाईल’ असे तो म्हणाला. तसेच, सलमान खान असण्याची सर्वात चांगली आणि वाईट गोष्ट म्हणजे स्वतः सलमान खानच, असे मजेशीर उत्तरही त्याने दिले.
