AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमानला सोफ्यावरून उठताही येईना; प्रकृतीविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त, पहा व्हिडीओ

मुंबईतील एका कार्यक्रमात सलमान उपस्थित होता. याच कार्यक्रमातील त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानला काऊचवरून उठताना बराच त्रास होत असल्याचं दिसतंय. ते पाहून नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त केली.

सलमानला सोफ्यावरून उठताही येईना; प्रकृतीविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त, पहा व्हिडीओ
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 29, 2024 | 8:25 AM
Share

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानने गुरुवारी मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात सलमान नेहमीप्रमाणे त्याच्या कॅज्युअल लूकमध्ये पोहोचला होता. कार्यक्रमातील त्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये सलमानला बसलेल्या जागेवरून उठायलाही बराच त्रास जाणवत होता. त्यामुळे चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. नंतर ही गोष्ट उघडकीस आली की सलमानच्या बरगड्यांना दुखापत झाल्याने त्याला उठता-बसताना त्रास जाणवत होता. दुखापतग्रस्त असतानाही सलमानने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं ठरवल्याने नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुकही केलं.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सलमान मंचावर इतर पाहुण्यांसोबत बसलेला दिसतोय. यानंतर जेव्हा त्याला पुढे बोलवतात, तेव्हा जागेवरून तो चाचपडत उठताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीससुद्धा दिसून येत आहेत. आरोग्याची समस्या असतानाही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सलमानचे विशेष आभार मानले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी सलमानच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे.

पहा व्हिडीओ

‘सलमानच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे, तरी काही मूर्ख लोक त्याच्यावर वाईट कमेंट्स करत आहेत. या वयातही सलमान इतरांच्या तुलनेत खूप फिट आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘तब्येत बरी नसतानाही भाईजान कार्यक्रमाला उपस्थित होता, हीच मोठी आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. कमेंट्समध्ये अनेकांनी सलमानला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

याच कार्यक्रमातील सलमानचा आणखी एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो ‘जलवा’ या गाण्यावर नाचताना दिसून येत आहे. सलमानला नाचताना पाहून उपस्थित प्रेक्षक त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करतात आणि शिट्ट्या वाजवतात. कार्यक्रमात सलमानसोबतच अभिनेत्री सोनाली बेंद्रेसुद्धा उपस्थित होती. तिच्यासोबतचा ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा मजेशीर किस्साही सलमाने सांगितला.

सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच ‘सिकंदर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि निर्माता साजिद नाडियादवाला पुन्हा एकत्र काम करणार आहेत. या दोघांनी आधी ‘किक’, ‘जुडवा’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.