Pathan : सलमान खान कामाला लागला; ‘पठाण’चे शुटिंग सुरू

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत.

Pathan : सलमान खान कामाला लागला; 'पठाण'चे शुटिंग सुरू

मुंबई : शाहरुख खानचा (Shahrukh Khan) चित्रपट पठाणची (Pathan) चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. (Salman khan starts shooting for Pathan movie)

पठाण चित्रपटाच्या शूटिंगनंतर सलमान खान ‘टाइगर 3’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. पठाण चित्रपटात सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. गुरुवारी स्टूडियोमध्ये टाइगर 3 चित्रपटासाठी एक पूजा ठेवली होती. जी प्रत्येक चित्रपटाच्या शूटिंग सुरू होण्याअगोदर ठेवण्यात येते. त्या पूजेलाही सलमान खानने उपस्थिती लावली होती. पूजामध्ये ‘टाइगर 3’ मध्ये व्हिलनची भूमिका साकारणारा इमरान हाश्मी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा देखील होते.

पूजाच्या अगोदर ‘पठाण’ चित्रपटाचे कॅमियो शूट करण्यासाठी सलमान खान स्टुडिओमध्ये आला होता. मार्चमध्ये टायगर 3 चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी तो पठाणचे शूट पूर्ण करेल. सलमान पठाण चित्रपटात अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग भारतातच नाहीतर जगातील वेगवेगळ्या प्रसिध्द ठिकाणी सुरू आहे.

बुर्ज खलिफा तेथे मार्चमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ आनंद आणि आदित्य चोप्रा यांच्या या चित्रपटात शाहरुख खान अ‍ॅक्शन सिन करताना दिसणार आहेत.या चित्रपटाचा सेटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओंमध्ये शाहरुख एका फिरत्या ट्रकच्या वर जबरदस्त अ‍ॅक्शन सीन करताना दिसत होता.

संबंधित बातम्या : 

Video : रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या महिलेने लावला दीपिकाच्या पर्सला हात, पाहा दीपिकाने काय केलं…

Video : बाॅलिवूडचा दबंग खान राखीच्याही मदतीला गेला धावून, आईने मानले आभार!

Tandav : अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कोणत्याही क्षणी अटक; सैफच्याही अडचणी वाढल्या

(Salman khan starts shooting for Pathan movie)

Published On - 2:20 pm, Fri, 26 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI