Radhe | ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा चित्रपट!

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटाची चाहते बर्‍याच दिवसांपासून अधीरतेने वाट पाहत होते. यापूर्वी सलमानने स्वत: हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती.

Radhe | ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा चित्रपट!
राधे
Harshada Bhirvandekar

|

Apr 21, 2021 | 4:02 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी चित्रपटाची चाहते बर्‍याच दिवसांपासून अधीरतेने वाट पाहत होते. यापूर्वी सलमानने स्वत: हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्याची घोषणा केली होती. पण, नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे देखील बोलले जात होते. चित्रपटाविषयी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे (Salman Khan upcoming movie Radhe your most wanted bhai will release on 13 may in theater and OTT).

सलमानचा ‘राधे’ (Radhe : Your Most Wanted Bhai) हा चित्रपट एकाच दिवशी थिएटर आणि ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 13 मे 2021 रोजी, अर्थात ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, जिथे सरकारने जारी केलेल्या कोव्हिड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाईल आणि झी5 वर ‘पे पर व्हू सेवा ZEEplex सोबतच भारतातील सर्व प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म जे ‘झी 5’शी संबंधित आहेत, तसेच डिश, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल हे प्रमुख डीटीएच ऑपरेटर डिजिटलवर हा चित्रपट पाहण्यास सक्षम असतील आणि प्रेक्षकांना त्यांच्या सोयीनुसार चित्रपट पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले जातील.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना ही माहिती दिली आहे. ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, असे या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.

पहा फिल्मची नवीन घोषणा

 (Salman Khan upcoming movie Radhe your most wanted bhai will release on 13 may in theater and OTT).

मनोरंजनाची वाट बघणाऱ्यांसाठी मेजवानी

झी स्टुडिओचे सीबीओ शरिक पटेल म्हणाले की, ‘या महामारीने आपल्याला काही तरी नवीन करण्याची संधी दिली आहे. सगळ्यात प्रथम हे नवीन वितरण धोरण आम्ही स्वीकारत आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या सर्वांना जवळच्या चित्रपटगृहांमध्ये नवीन चित्रपट पहायला आवडत असले तरी, आम्हाला वाटते आहे की, सलमानच्या चाहत्यांसाठी काहीतरी वेगळे करावे. एका वर्षापेक्षा जास्त काळ मनोरंजनाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘राधे’पेक्षा चांगला दुसरा कोणताही चित्रपट असू शकत नाही.’

जॉन अब्राहमशी टक्कर!

याक्षणी, सलमान खानचा ‘राधे’ बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’शी स्पर्धा करण्यास सज्ज झाला आहे. ‘राधे’ हा चित्रपट 13 मे रोजी रिलीज होत आहे आणि ‘सत्यमेव जयते 2’ देखील त्याच दिवशी रिलीज होईल. यापूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. पडद्यावर कोणता चित्रपट रसिकांचे मन जिंकतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Salman Khan upcoming movie Radhe your most wanted bhai will release on 13 may in theater and OTT).

हेही वाचा :

अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर

Vijay Raaz Case | विनयभंगाची तक्रार, अभिनेता विजय राज यांना बॉम्बे हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें