Salman Vs Aishwarya : ऐश्वर्या राय की सलमान खान, दोघांपैकी श्रीमंत कोण? कोणाकडे किती संपत्ती?

Salman Khan Vs Aishwarya Rai Net Worth: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खान या दोघांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रचंड नाव कमावलंय. केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांची लोकप्रियता आहे. हे दोघंही श्रीमंतीच्या बाबतीतही मागे नाहीत. या दोघांकडे किती संपत्ती आहे आणि कोण किती श्रीमंत आहे, ते पाहुयात..

Salman Vs Aishwarya : ऐश्वर्या राय की सलमान खान, दोघांपैकी श्रीमंत कोण? कोणाकडे किती संपत्ती?
सलमान खान, ऐश्वर्या राय
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2025 | 9:46 AM

Salman Khan Vs Aishwarya Rai Net Worth: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता सलमान खान या दोघांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. या दोघांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक दमदार चित्रपटांमध्ये काम केलंय. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या अफेअरच्या चर्चाही तुफान गाजल्या होत्या. 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम दिल दे चुके सनम’च्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होतं. परंतु जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. या दोघांचं अफेअर जितकं चर्चेत होतं, त्यापेक्षा अधिक त्यांच्या ब्रेकअपची चर्चा झाली होती. सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमकहाणीचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले आणि वाचले असतील. परंतु आज आपण त्यांच्या संपत्तीविषयीची माहिती जाणून घेऊयात. या दोघांपैकी कोण अधिक श्रीमंत आहे, कोणाकडे किती संपत्ती आहे, ते पाहुयात..

ऐश्वर्या रायची संपत्ती

ऐश्वर्याने 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इरुवर’ या चित्रपटातून ऐश्वर्याने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. तर त्याच वर्षी ‘और प्यार हो गया’मधून तिने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं. तिने ‘हम दिल दे चुके सनम’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मोहब्बतें’, ‘देवदास’, ‘धूम 2’, ‘गुरू’ आणि ‘ऐ दिल है मुश्कील’सारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. एका चित्रपटासाठी ती जवळपास 10 कोटी रुपये मानधन स्वीकारते. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती 6 ते 7 कोटी रुपये घेते. जूही चावलानंतर ती देशातील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती तब्बल 900 कोटी रुपये आहे.

सलमान खानची संपत्ती

सलमान खानने ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एण्ट्री केली. त्यानंतर त्याने आतापर्यंतच्या करिअरमध्ये ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ‘तेरे नाम’, ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग’, ‘दबंग 2’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सलमानची एकूण संपत्ती तब्बल 2900 कोटी रुपये इतकी आहे. एका चित्रपटासाठी तो ऐश्वर्याच्या दहा पट म्हणजेच 100 कोटी रुपयांपर्यंत फी घेतो.

सलमान त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईतील वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. या अपार्टमेंटची किंमत 100 ते 150 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे ऑडी ए8 एल, ऑडी आरएस 7, मर्सिडीज एस क्लास, रेंज रोव्हर वोग ऑटोबायोग्राफी, मर्सिडीज बेंज जीएल 350 सीडीआय आणि पोर्श केयेन टब्रो यांसारख्या आलिशान आणि अत्यंत महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.