तब्बल ४६०० कोटींच्या मालकीणीच्या प्रेमात पडला होता सलमान खान, लग्नही करणार होता, पण..
बॉलीवूडस्टार सलमान खान याचं लग्न कधी होणार याचा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेला असतो. आता सलमान चक्क ५९ वर्षांचा झाला आहे. परंतू अनेक वर्षांपूर्वी एका चुलबुली अभिनेत्रीवर त्याचा जीव बसला होता. करीयरच्या अगदी सुरुवातीलाच सलमान बोहल्यावर चढणार होता, पण माशी कुठं शिंकली...ते पाहा

बॉलीवुडच्या सर्वात पॉप्युलर अभिनेता सलमान खान याचे अनेक सुंदरीशी अफेयर होते. किमान अर्धा डझन अभिनेत्रींना सलमान डेट केले आहे. परंतू तरीही सलमान ५९ वयातही एकटा आहे. त्याने अजूनपर्यंत लग्न केलेले नाही. त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये तर लग्न केल्यानंतर काही बखेडा झाला तर पोटगी म्हणून मुली संपूर्ण पैसा घेऊन जादात असेही म्हटले होते. परंतू करिअरच्या अगदी सुरुवातीला सलमान एका हिरोईनच्या प्रेमात पडला होता. तो लग्नाचा प्रस्ताव घेऊन तिच्या वडिलांना देखील भेटला होता…पण…
सलमान सुरुवातीला अभिनेत्री संगिता बिजलानी हीला डेट करत होते. दोघांचे लग्न देखील ठरले होते. पत्रिकाही छापल्या होत्या. परंतू त्याचं लग्न काही झाले नाही. आणखी एका अभिनेत्रीवर सलमानचा जीव जडला होता ती होती चुलबुली अभिनेत्री जुही चावला. ९० च्या दशकात जुही सुपरस्टार होती. तिच्यामागे सलमान लागला होता.
८० च्या दशकात आपले करियर सुरु करणारी अभिनेत्री जुही ९० च्या दशकात मोठी स्टार झाली होती. तिचा अभिनय आणि सुंदरतेमुळे लाखो फॅन्स फिदा होते. सलमानच्या मनातही तिला मागणी घालावी असा विचार आला. सलमान खान तिच्या सोबत संसार करण्याची स्वप्न पहात होता. अभिनेता सलमान यासाठी जुहीच्या वडिलांना एकदा भेटला. परंतू तिच्या वडीलांना या नात्यास नकार दिला.
येथे पोस्ट पाहा –
View this post on Instagram
सलमान-जुही पडद्यावर एकत्र आले नाही
जूही चावला हीने साल १९८६ च्या ‘सल्तनत’ चित्रपटातून डेब्यू केले तर सलमानने १९८८ च्या ‘बीवी हो तो ऐसी’मधून डेब्यु केले.परंतू दोघांनी लीड कॅरेक्टर म्हणून कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केले नाही. सलमान जुहीच्या सोबत केवळ ‘दीवाना मस्ताना’ या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसला होता. यात जुही सोबत लीड रोल गोविंदा आणि अनिल कपुर यांनी केला होता.
भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे जूही
आपल्या करीयरमध्ये एकाहून एक चांगले हिट चित्रपट देणारी जूही भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. साल २०२४ च्या हुरुन रिच लिस्टनुसार तिची एकून नेटवर्थ ४६०० कोटी रुपये आहे. श्रीमंतीच्या बाबतीत अन्य कोणतीही अभिनेत्री तिच्या आजूबाजूलाही नाही. अभिनेत्री ऐश्वर्या ९०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
