घटस्फोटानंतर 4 वर्षांनी समांथा रुथ प्रभूने नागा चैतन्यची शेवटची आठवणही पुसली; व्हिडिओ व्हायरल
सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर चार वर्षांनी, सामंथाने नागा चैत्यन्यची शेवटची प्रेमाची आठवण ही पुसून टाकली आहे. एका व्हिडीओवरून चाहत्यांच्या ती गोष्ट लक्षात आली.

समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य हे एकेकाळी खूप रोमँटिक जोडपे म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जुन्या मुलाखती आता देखील व्हायरल होताना दिसतात. पण त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्व चाहत्यांना नाराज केलं होतं. नागा चैतन्य आणि समंथा 2020 मध्ये वेगळे झाले आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी लग्न केलं. मात्र समांथा अजूनही सिंगल आहे. दरम्यान अनेक मुलाखतींमध्ये समांथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल , तसेच त्यांच्या नात्याबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलताना दिसली.
समांथा रूथ प्रभूने नागा चैतन्यची ती आठवणं पुसली
दरम्यान आता समांथाने दोघांच्या प्रेमाची शेवटची निशाणीही पुसली आहे. आणि त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. 2021 मध्ये दोघांनीही टॅटूद्वारे आपले प्रेम व्यक्त केले होते. तथापि, आता दोघेही वेगळे झाले आहेत. अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने शुक्रवारी ‘नथिंग टू हाइड’ची घोषणा करून खळबळ उडवून दिली. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एका छोट्या टीझर व्हिडिओद्वारे याची घोषणा केली. व्हिडिओमध्ये समांथा स्वतः देखील दिसत आहे. परंतु नवीन उपक्रमाव्यतिरिक्त, अनेक चाहत्यांच्या लक्षात आले की सामंथाच्या पाठीवरील टॅटू गायब आहे, जो तिने काही वर्षांपूर्वी नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर काढला होता.
View this post on Instagram
व्हिडिओ पाहून चाहत्यांच्याही लक्षात आली ती गोष्ट
व्हिडिओमध्ये, समांथा कॅमेऱ्याजवळ जाते आणि मार्करने ‘लपवण्यासारखे काही नाही’ असे लिहताना दिसते. त्यानंतर ती वळते आणि निघून जाते. तेव्हा काही चाहत्यांच्या लक्षात आले की समांथाने काढलेला YMC टॅटू, जो तिच्या ‘ये माया चेसावे’ या चित्रपटाचे प्रतीक होता, तो दिसत नाही. एका चाहत्याने म्हटले, “समंथाने तिचा YMC टॅटू काढला आहे.”, दुसऱ्याने म्हटले, “मला कोणताही टॅटू दिसत नाही.” हा टॅटू महत्त्वाचा होता कारण 2010 मध्ये सामंथाने ज्या चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते तो माया चेसावे होता. याच चित्रपटाने तिला चित्रपटाचा मुख्य नायक नागा चैतन्यशी ओळख करून दिली. दोघांनी त्यानंतरच डेटिंग सुरू केली आणि अखेर 2017 मध्ये लग्न केले.
तथापि,चाहते असा अंदाज लावत आहेत की सामंथाने आता याच कारणासाठी YMC टॅटू काढला आहे. परंतु काहींनी म्हटले आहे की सामंथाने फक्त जाहिरातीसाठी टॅटू झाकला होता, कारण तो एक ब्रँडचं प्रमोशन होतं.
नागा चैत्यन्यसाठी ती गोष्ट केल्याबद्दल समांथाला दु:ख
दरम्यान एप्रिल 2022 मध्ये, सामंथाने टॅटू काढल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर प्रतिसादात एक व्हिडिओ पोस्ट केला आणि स्पष्ट, कडक शब्दात म्हटले, “कधीही टॅटू काढू नका. कधीही नाही. कधीही टॅटू काढू नका.” असं म्हणत तिने राग व्यक्त केला होता.
