Samantha | घटस्फोटानंतरही समंथाने तिच्यासोबत कायम ठेवली नाग चैतन्यची ‘ही’ आठवण

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षांच्या संसारानंतर ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

Samantha | घटस्फोटानंतरही समंथाने तिच्यासोबत कायम ठेवली नाग चैतन्यची 'ही' आठवण
SamanthaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:59 PM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतीच ‘सिटाडेल’ या अमेरिकन वेब सीरिजच्या प्रीमिअरला हजेरी लावली होती. लंडनमध्ये या सीरिजच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी समंथाने काळ्या रंगाचा ग्लॅमरस ड्रेस परिधान केला होता. या प्रीमिअरमधील समंथाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील समंथाच्या एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. समंथाने तिच्या कमरेच्या वरच्या बाजूस नाग चैतन्यशी संबंधित एक टॅटू काढला होता. घटस्फोटानंतरही तिने त्या टॅटूची आठवण जपल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

समंथाचा पूर्वाश्रमीचा पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य हा ‘चै’ या टोपणनावानेही ओळखला जातो. याच टोपणनावाचा टॅटू समंथाने तिच्या कमरेच्या वरच्या बाजूस काढला होता. समंथाच्या आताच्या या फोटोंमधील टॅटूने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. घटस्फोटानंतरही तिने तो टॅटू तसाच ठेवल्याचं पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

समंथाचे तीन टॅटू

समंथाने तिच्या शरीरावर तीन टॅटू काढलेले आहेत. ते तिन्ही टॅटू नाग चैतन्यशी संबंधित आहेत. ‘YMC’ असा एक टॅटू तिने काढला होता. ‘ये माया चेसावे’ असं त्याचा अर्थ असून हा तिचा नाग चैतन्यसोबतचा पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. समंथाने ‘Chay’ असा आणखी एक टॅटू काढला आहे. नाग चैतन्यला अनेकजण ‘चै’ या नावाने ओळखतात. हे त्याचं टोपणनाव आहे. समंथाच्या हातावर वायकिंग सिम्बॉलचाही टॅटू आहे. असाच टॅटू नाग चैतन्यच्याही हातावर पहायला मिळतं.

‘आयुष्यात टॅटू कधीच काढू नकोस’; समंथाचा चाहत्याला सल्ला

घटस्फोटानंतर समंथाने एका चाहत्याला आयुष्यात कधीच टॅटू न काढण्याचा सल्ला दिला होता. इन्स्टाग्रामच्या ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनच्या माध्यमातून तिने चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. एका चाहत्याने समंथाला टॅटूबद्दल (Tattoo) प्रश्न विचारला असता, तिने आयुष्यात कधीच टॅटू काढू नकोस असा सल्ला दिला होता.

‘टॅटूसाठी काही कल्पना तुझ्या डोक्यात आहेत का, ज्या तुला भविष्यात काढायला आवडतील’, असा प्रश्न एका चाहत्याने समंथाला विचारला होता. त्यावर ती म्हणाली, ‘एक गोष्ट मी स्वत:लाच सांगू इच्छिते की कधीच टॅटू काढू नकोस. कधीच नको. कधीच म्हणजे कधीच टॅटू काढू नकोस.’

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षांच्या संसारानंतर ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.