AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha: ‘आयुष्यात टॅटू कधीच काढू नकोस’; समंथाने चाहत्याला का दिला असा सल्ला?

नुकतंच समंथाने इन्स्टाग्रामवर (Instagram) 'आस्क मी एनिथिंग' सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्याने समंथाला टॅटूबद्दल (Tattoo) प्रश्न विचारला असता मात्र तिने आयुष्यात कधीच टॅटू काढू नकोस असा सल्ला दिला.

Samantha: 'आयुष्यात टॅटू कधीच काढू नकोस'; समंथाने चाहत्याला का दिला असा सल्ला?
Samantha Ruth Prabhu Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 18, 2022 | 10:48 AM
Share

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिच्या दमदार अभिनयासोबतच बेधडक वक्तव्यांसाठीही ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी समंथा अनेकदा चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं मनमोकळेपणाने देते. प्रसंगी ट्रोलिंगलाही ती सडेतोड उत्तर देताना दिसते. नुकतंच समंथाने इन्स्टाग्रामवर (Instagram) ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्याने समंथाला टॅटूबद्दल (Tattoo) प्रश्न विचारला असता मात्र तिने आयुष्यात कधीच टॅटू काढू नकोस असा सल्ला दिला. विशेष म्हणजे समंथाने स्वत: तीन टॅटू काढले आहेत. त्यामुळे तिने चाहत्याला असा सल्ला का दिला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

‘टॅटूसाठी काही कल्पना डोक्यात आहेत का, ज्या तुला भविष्यात काढायला आवडतील’, असा प्रश्न एका चाहत्याने समंथाला विचारला. त्यावर ती म्हणाली, ‘तुम्हाला माहित आहे का, एक गोष्ट जी मी मला सांगू इच्छिते की कधीच टॅटू काढू नकोस. कधीच नको. कधीच म्हणजे कधीच टॅटू काढू नकोस.’ टॅटू न काढण्याबाबत समंथाचा इतका आग्रह का आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं.

पहा फोटो-

समंथाने काढलेले तीन टॅटू हे तिचा पूर्वाश्रमीचा पती नाग चैतन्यशी संबंधित आहेत. ‘YMC’ असा एक टॅटू तिने काढला होता. ‘ये माया चेसावे’ असं त्याचा अर्थ असून हा तिचा नाग चैतन्यसोबतचा पहिला चित्रपट होता. याच चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. समंथाने ‘Chay’ असा आणखी एक टॅटू काढला आहे. नाग चैतन्यला अनेकजण ‘चै’ या नावाने ओळखतात. हे त्याचं टोपणनाव आहे. समंथाच्या हातावर वायकिंग सिम्बॉलचाही टॅटू आहे. असाच टॅटू नाग चैतन्यच्याही हातावर पहायला मिळतं.

समंथा आणि नाग चैतन्यने 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चार वर्षांच्या संसारानंतर ही लोकप्रिय जोडी विभक्त झाली. 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नाग चैतन्यने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा:

Yash: कंगना रनौत KGF 2 स्टार यशच्या प्रेमात; चित्रपट पाहिल्यावर म्हणाली..

Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..

परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.