AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सत्यशोधक’ चित्रपट टॅक्स फ्री करणार; मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा

समाजाला सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित 'सत्यशोधक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी हा चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री करणार असल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

'सत्यशोधक' चित्रपट टॅक्स फ्री करणार; मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा
satyashodhak movieImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 04, 2024 | 3:16 PM
Share

नाशिक : 4 जानेवारी 2024 | क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा प्रीमियर नाशिकमध्ये पार पडला. या प्रीमियर शोसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती. हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ भावूक झाल्याचं पहायला मिळालं. “‘सत्यशोधक’ या चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

यावेळी चित्रपटाचे निर्माते, विविध कलाकार सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह पदाधिकारी आणि बहुसंख्येने नागरिकदेखील उपस्थित होते. मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकारांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “महात्मा फुले यांचा जीवनपट अतिशय उत्तम प्रमाणे सत्यशोधक चित्रपटात मांडणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांचं कार्य बघता एका चित्रपटात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले जाऊ शकत नाही. तर प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील.”

“कुठल्याही धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांचा लढा नव्हता. त्यांचं लढा ब्राम्हणांच्या विरुद्ध नव्हे तर ब्राम्हण्य वादाच्या विरोधात होता. जो पर्यंत आपण आपला हा इतिहास माहिती होत नाही तो पर्यंत आपल्याला समाज सुधारकांचे विचार आपल्याला तळागाळात पोहोचवता येणार नाही. त्यासाठी सत्यशोधक चित्रपट हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्र भरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा,” असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

सत्यशोधक या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे ही सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 5 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Follow Us
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....