AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाती काम नाही.. पैसे नाही.. प्लीज हेल्प; विवेक ओबेरॉयच्या हिरोइनने मांडली व्यथा

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत कामाची मागणी केली आहे. हाती काम नाही, पैसे नाहीत.. अशा शब्दांत तिने व्यथा मांडली आहे. इतकंच नव्हे सोशल मीडियावर फॉलोअर्स नसल्याने काम मिळत नसल्याची तक्रार तिने केली आहे.

हाती काम नाही.. पैसे नाही.. प्लीज हेल्प; विवेक ओबेरॉयच्या हिरोइनने मांडली व्यथा
संध्या मृदुलImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 27, 2025 | 3:01 PM
Share

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार कामाच्या शोधात असतात. अगदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री नीना गुप्तासुद्धा एकेकाळी कामाच्या शोधात होत्या. सोशल मीडियाद्वारे त्यांनी थेट कामाची मागणी केली होती. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने हाती काम नसल्याने निराशा व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी असल्याने काम मिळत नसल्याची तक्रार तिने केली आहे. त्याचसोबत या अभिनेत्रीने काम देण्याची विनंती केली आहे. या अभिनेत्रीने विवेक ओबेरॉयसह इतर अनेक कलाकारांसोबत काम केलंय. तिचं नाव आहे संध्या मृदुल.

‘पेज 3’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘साथियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री संध्या मृदुलने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आयुष्यातील कठीण काळाचा खुलासा केला आहे. माझ्याकडे ना काम आहे ना पैसा.. अशा शब्दांत तिने व्यथा मांडली आहे. त्याचसोबत तिने असंही म्हटलंय की आजकाल लोक सोशल मीडियावरील फॉलोअर्सला अधिक महत्त्व देतात. “एक नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे की फॉलोअर्स नसतील तर काम मिळणार नाही. पण जर कामच मिळत नसेल, तर माणूस लोकप्रिय किंवा प्रसिद्ध कसा होणार? जर प्रसिद्ध होत नसेल तर फॉलोअर्स कसे वाढणार? फॉलोअर्स मिळणार नसतील तर तो प्रसिद्ध कसा होणार, काम कसं मिळणार, तुम्हाला समजतंय ना? खूप गोंधळात टाकणारी ही बाब आहे”, असं तिने लिहिलंय.

संध्या इथवरच थांबली नाही तर पुढे तिने असंही म्हटलंय की, “माझ्याकडे आधीपासून जे काम होतं, तेसुद्धा आता राहिलेलं नाही. कारण माझे फॉलोअर्स जास्त नाही. वरून माझी मॅनेजर मला म्हणते की, मॅडम तो प्रोजेक्ट तुझ्या हातून निघून गेला कारण एकतर तुमचे फॉलोअर्स कमी आहेत आणि तुमचा लूक श्रीमंतांसारखा आहे. तुम्ही श्रीमंत दिसता. माझा लूक श्रीमंतांसारखा आहे.. पण मी श्रीमंत नाही. कारण मला काम नाही मिळालं तर माझे फॉलोअर्स कसे वाढणार आणि मी प्रसिद्ध कशी होणार? मला काम मिळालं नाही, पैसे मिळाले नाहीत तर केवळ माझा लूकच श्रीमंतांसारखा असेल, मी नाही. मी सर्वांना विनंती करते की माझी मदत करा.” संध्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.