Thalapati Vijay Wife : ऑटोग्राफ घ्यायला आली आणि बायको बनली… विजय याची पत्नी संगीता आहे तरी कोण ? कशी सुरू झाली Love Story ?

सुपरस्टार विजय आणि संगीता सोरनलिंगम यांच्या २६ वर्षांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले आहे. संगीताने चेन्नई न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची चर्चा आहे. युनायटेड किंग्डममध्ये वाढलेल्या संगीताच्या कुटुंबीयांचे मूळ श्रीलंकेतील तमिळ समुदायाशी जोडलेले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहिलेली संगीता आता अचानक चर्चेत आहे, ज्यामुळे विजयच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Thalapati Vijay Wife : ऑटोग्राफ घ्यायला आली आणि बायको बनली... विजय याची पत्नी संगीता आहे तरी कोण ? कशी सुरू झाली Love Story ?
विजय-संगीता लव्हस्टोरी
Image Credit source: social media
| Updated on: Feb 28, 2026 | 11:58 AM

Who is Sangeetha Sornalingam : साऊथचा सुपरस्टार आणि राजकारणी विजयचं वैयक्तिक आयुष्य सध्या खूरप चर्चेत आलं आहे. त्याच्या पर्सनल आयुष्यात वादळ आलंय. रिपोर्ट्सनुसार, त्याची पत्नी संगीता सोरनलिंगम हिने तामिळनाडूतील चेंगलपट्टू कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे 26 वर्षानंतर विजयचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. 25 ऑगस्ट 1999 साली विजय संगीताचं लग्न झालं, त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुलंही आहेत. आपलं वैयक्तिक आणि वैवाहिक जीवन नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवणारे हे जोडपं आता अचानक चर्चेत आले आहे. या बातमीने विजयच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन दशकांपेक्षा अधिक काळ एकत्र असलेल्या या दोघांच्या नात्यात दुरावा यायला असं काय झालं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहेच.

यूकेमध्ये संगोपन, श्रीलंकेशीही नातं

विजयची पत्नी संगीता सोरनलिंगमचा जन्म युनायटेड किंग्डममध्ये झाली. ती तिथेच लहानाची मोठी झाली. मात्र तिच्या कुंटुंबाची मुळे श्रीलंकेच्या तमिळ समुदायाशी निगडीत आहेत. तिचे वडील एक प्रसिद्ध तमिळ उद्योगपती होते जे नंतर यूकेमध्ये स्थायिक झाले. विजयशी लग्न झाल्यानंतरही संगीताने कधीही स्टारडमचा भाग बनण्याचा प्रयत्न केला नाही. ती नेहमी मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिली.

आधी होती फॅन, मग बनली आयुष्याची जोडीदार

अभिनेता विजय आणि संगीताची प्रेमकहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा विजयचा ‘पूवे उनाक्कागा’ हा चित्रपट सुपरहिट झाला तेव्हा लंडनमध्ये राहणारी संगीता त्याचे अभिनंदन करण्यासाठी चेन्नईला गेली होती. असं म्हटलं जातं की फिल्म सिटीमध्ये शूटिंग दरम्यान त्या दोघांची भेट झाली. तिच्या साधेपणाने आणि चांगल्या मनाने विजय प्रभावित झाला, त्याने तिला घरी बोलावलं आणि तिच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. हळूहळू दोन्ही कुटुंबे जवळ आली आणि नात्याबद्दलच्या चर्चा वाढल्या. विजयचे पालक संगीताच्या कुटुंबाला भेटण्यासाठी लंडनलाही गेले होते. दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने त्यांचं लग्न झालं. विजय हिंदू तर संगीत ख्रिशचन, पण वेगळे धर्म असूनही दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केलं आणि चेन्नईत भव्य रिसेप्शनही दिलं.

लाइमलाईटपासून राहिली दूर

लग्नानंतर संगीताने नेहमीच लो प्रोफाइल आयुष्य जीवन निवडले, लाईमलाइटपासून ती दूरच होती. चित्रपट कार्यक्रमांमध्येसुद्धा ती क्वचितच दिसायची. “वारिसु” च्या ट्रेलर लाँचसारख्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तिच्या अनुपस्थितीमुळेही यापूर्वी त्या दोघांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र नंतर त्या फेटाळून लावण्यात आल्या. आई म्हणून, तिने तिच्या मुलांचे संगोपन करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि त्यांना मीडियापासून दूर ठेवले. जेसन संजय आणि दिव्या साशा हे दोघंबी अगदी क्वचित, सार्वजनिक ठिकाणी दिसतात.

सध्या अभिनेता विजय हा त्याच्या ‘जन नायगन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे, तो त्याच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट असल्याचे म्हटले आहे. यानंतर, तो अभिनय सोडून, पूर्पणेराजकारणात प्रवेश करेल आणि तमिलगा वेत्री कझगम या पक्षाच्या माध्यमातून एक नवीन इनिंग सुरू करणार आहे. मात्र विजय व संगीताचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही बातमी खरोखरच त्यांच्या नात्याचा शेवट आहे की नवीन ट्विस्ट येणार आहे असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. विजय किंवा संगीता पैकी कोणीच यावर अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही.

 

Follow Us