Sania Mirza | कठीण काळात ‘या’ खास व्यक्तीची सानिया मिर्झाला खंबीर साथ, टेनिस स्टारनेच केला खुलासा

ताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या आयुष्यातील कठीण फेजमधून जात आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत झालेलं तिचं लग्न मोडलं. काही काळापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. या सर्व गोष्टींमुळे, घटस्फोटामु्ळे सध्याचा काळ सानियासाठी अतिशय कठीण आहे. मात्र या परिस्थितीमध्ये ती एकटी नाहीये.

Sania Mirza |  कठीण काळात 'या' खास व्यक्तीची सानिया मिर्झाला खंबीर साथ, टेनिस स्टारनेच केला खुलासा
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 2:57 PM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सध्या आयुष्यातील कठीण फेजमधून जात आहेत. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत झालेलं तिचं लग्न मोडलं. काही काळापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या संसारात सगळं आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हापासूनच सानियाच्या खासगी आयुष्याबद्दलही चर्चा सुरू झाली. ती सतत फोकसमध्ये होती. त्यानंतर तिचा माजी पती शोएब मलिकने तिसरं लग्न केलं. पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्याशी त्याने निकाह केला. या सर्व गोष्टींमुळे, घटस्फोटामु्ळे सध्याचा काळ सानियासाठी अतिशय कठीण आहे. मात्र या परिस्थितीमध्ये ती एकटी नाहीये.

एक खास व्यक्ती अशी आहे जी सानियाची बेस्टफ्रेंड म्हणून आणि एक साथीदार म्हणून तिच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहे. ती व्यक्ती म्हणजे सानिया बहीण अनम मिर्झा.

हे सुद्धा वाचा

सानियाने शेअर केली पोस्ट

सानियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून बहीणच आपला मोठा सपोर्ट असल्याचे नमूद केले आहे. तिने अनम सोबत तीन फोटो शेअर केले आहेत. ‘ बहिणीच्या कौतुकासाठी पोस्ट. माझी रॉक ( मजबूत समर्थन). बेस्ट फ्रेंड, विश्वासपात्र, दु:ख कमी करणारी, कठीण परस्थितीत मार्ग शोधणारी. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ‘ असं सानियाने तिच्या पोस्टमध्ये लिहीलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

अनमनेही दिलं उत्तर

सानियाची ही पोस्ट पाहून तिची बहीण अनम खूप भावूक झाली. तिनेही तिच्या पोस्टवर कमेंट केली . ‘तू माझं संपूर्ण जग आहेस’ असं लिहीत तिनेही सानियाचं कौतुक केलं. तिच्या आईनेही या पोस्टला लाइक करत दोघी बहिणींचं कौतुक केलं.

सानिया आणि अनम दोघींमध्ये स्ट्राँग बाँड आहे. ती जेव्हा टूर्नामेंटसाठी बाहेर जाते तेव्हा अनम तिच्या लेकाची काळजी घेते. कोणत्याही कठीण परिस्थितीत अनमने सानियाला एकटं सोडलं नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केली होती पोस्ट

शोएब मलिकने सना जावेदशी लग्न केल्यानंतर अनमनेच सानियाच्या वतीने एक पोस्ट शेअर करत अधिकृत प्रतिक्रिया दिली होती. ‘ सानिया हिने कायम स्वतःचं खासगी आयुष्य सार्वजनिक आयुष्यापासून दूर ठेवलं आहे. पण आता एक गोष्ट सांगणं फार महत्त्वाचं आहे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाला आहे. सानिया हिने शोएब याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या सानिया हिच्या आयुष्यातील प्रचंड नाजूक काळ सुरु आहे. म्हणून चाहत्यांना विनंती आहे की, सानिया हिच्या गोपनीयतेचा आदर करा. शिवाय कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका….’ असे अनमने पोस्टमध्ये लिहीले होते.

Non Stop LIVE Update
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले
विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा? मविआचे 3 फॉर्म्युले.
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात
ओबीसींना पंकजा मुंडे यांचा पाठिंबा, तर छगन भुजबळही उतरले मैदानात.
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.