AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त पेक्षा १९ वर्षांनी लहान, पण संकटात माधुरी दीक्षित जे करु शकली नाही, ते तिने केलं

१९ वर्ष लहान अभिनेत्रीवर जडला संजय दत्त याचा जीव... संकट काळात तिनेही नाही सोडली नाही अभिनेत्याची साथ, माधुरी दीक्षित नाही तर, कोण आहे 'ती'?

संजय दत्त पेक्षा १९ वर्षांनी लहान, पण संकटात माधुरी दीक्षित जे करु शकली नाही, ते तिने केलं
| Updated on: Feb 25, 2023 | 5:51 PM
Share

Sanjay Dutt Love Story : अभिनेता संजय दत्त (sanjay datt) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. एक काळ असा होता ज्यामुळे संजय दत्त वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यामुळे संजूबाबाच्या खासगी आणि प्रोफेशन आयुष्यावर त्याचा परिणाम झाला. महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल देखील अनेक खुलासे केले. अभिनेत्याने त्याला ३०८ गर्लफ्रेंड्स असल्याचं देखील सांगितलं. त्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचं देखील नाव होतं. पण दोघांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. माधूरीने अर्ध्यातच संजय दत्त यांची साथ सोडली. पण संजूबाबाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती होती जिने कधीही अभिनेत्याची साथ सोडली. चांगल्या – वाईट काळत ती खंबीरपण संजय दत्त याच्यासोबत उभी राहिली.

संजूबाबा याच्या आयुष्यातील ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्याची पत्नी मान्यता दत्त आहे. मान्यता आणि संजय यांची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही. मान्यता हिच्यासोबत लग्न करण्याआधी संजयचे दोन लग्न झाले होते. अभिनेत्याच्या आयुष्यात अनेक मुली देखील आल्या. पण मान्यताने कधीही अभिनेत्याची साथ सोडली नाही. कठीण काळात देखील मान्यता संजयसोबत उभी राहिली.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

रिपोर्टनुसार, मान्यता आणि संजय यांची पहिली भेट झाली तेव्हा अभिनेता नादिया दुरानी हिला डेट करत होता. पण मान्यता आणि नादिया यांचा स्वभाव पूर्णपणे वेगळा होता. नादिया हिला संजयच्या संपत्तीवर प्रेम होतं, तर दुसरीकडे मान्यता संजयच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होती. असं करत मान्यताने संजयच्या मनात स्वतःसाठी खास जागा तयार केली.

मान्यता सिनेमाच्या शुटिंगच्या ठिकाणी संजय याच्यासाठी जेवणाचे डब्बे घावून जायची. मान्यता संजय दत्त याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची. ती संजूबाबाच्या मित्रांसोबत चांगले संबंध ठेवायची. ज्यामुळे संजयला हळूहळू मान्यता आवडायला लागली होती. कालांतराने संजूबाबा मान्यताच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता.

दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मान्यता आणि संजय यांनी हिंदू पद्धतीत लग्न केलं. ११ फेब्रुवारी २००८ मध्ये संजय आणि मान्यता यांनी लग्न केलं. लग्न झाल्यानंतर चाहते आणि सेलिब्रिटींनी दोघांना नव्या आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

लग्नानंतर दोन वर्षांनंतर मान्यता – संजय जुळ्या मुलांचे आई – वडील झाले. मान्यता हिने एक मुलगा आणि मुलीला जन्म दिला. आता संजय पत्नी मान्यता आणि मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. शिवाय अभिनेता कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत कायम प्रेम व्यक्त करताना दिसतो.

ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.