AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख?

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. परंतु त्यावेळी त्याच्या तोंडात मधमाशी गेली आणि मधमाशीने तोंडात चावा घेतल्याने हा परिणाम झाल्याचं म्हटलं जात आहे. तज्ज्ञांकडून याविषयी अधिक जाणून घेऊयात..

मधमाशी गिळल्याने करिश्माच्या पूर्व पतीचा मृत्यू? किती प्राणघातक ठरू शकतो डंख?
Sunjay Kapoor and Karisma KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 17, 2025 | 10:01 AM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी निधन झालं. इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचं निधन झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं होतं. परंतु नंतर एक धक्कादायक दावा समोर आला की संजयने पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळली. त्यामुळेच त्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेनंतर मधमाशी गिळल्याने खरंच हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

मधमाशी गिळल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?

सर गंगाराम रुग्णालयातील औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एम. वल्ली यांनी ‘आजतक डॉट इन’शी बोलताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. मधमाशीने संजयच्या जीभेचा चावा घेतल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. जीभ ही आपल्या शरीराची अत्यंत संवेदनशील आणि रक्तवाहिन्यांनी भरलेली रचना आहे. जर मधमाशीने जिभेला चावलं असेल तर तिचं विष लगेच रक्तात जाऊ शकतं. यामुळे लगेचच आपलं शरीर ॲलर्जिक प्रतिक्रिया देऊ शकते. डॉ. वल्ली यांनी पुढे स्पष्ट केलं की, सर्वसामान्यपणे ॲलर्जीच्या प्रतिक्रिया सौम्य असू शकतात. जसं की त्वचेवर खाज सुटणं किंवा लाल पुरळ येणं. परंतु जे लोक ॲलर्जीच्या बाबतीत अतिसंवेदनशील असतात, त्यांच्यामध्ये ही प्रतिक्रिया खूप गंभीर असू शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत ॲनाफिलेक्सिस म्हणतात. ही स्थिती इतकी गंभीर असू शकते की त्यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते, रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटकादेखील येऊ शकतो.

या प्रकरणात इतर अनेक तज्ज्ञांनीही आपली मतं नोंदवली आहेत. बंगळुरूच्या किम्स हॉस्पिटलमधील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. दीपक कृष्णमूर्ती यांनी याला ‘कौनिस सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराशी जोडलं आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिलं की, हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. कौनिस सिंड्रोम ही एक गंभीर ॲलर्जीक प्रतिक्रिया आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. संजय कपूरने पोलो खेळताना मधमाशी गिळली, त्यानंतर मधमाशीने घशाला चावा घेतला असावा आणि त्यामुळेच ॲनाफिलेक्सिस आणि मायोकार्डियल इन्फार्क्शन झाला असावा, ज्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असावा.

मधमाशीचं विष जर तोंडात किंवा घशात चावल्यामुळे रक्तप्रवाहात गेलं तर त्यामुळे श्वसनमार्गात सूज येऊ शकते, रक्तदाबात तीव्र घट होऊ शकते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, असंही तज्ज्ञांनी म्हटलंय. ही एक प्रकारची मेडिकल इमर्जन्सी केस ठरू शकते.

मधमाशीचा डंख किती धोकादायक?

मधमाशीच्या डंखामुळे सहसा सौम्य जळजळ, सूज किंवा खाज येते. परंतु जर चावा घशात किंवा तोंडात घेतला असेल तर ते अधिक धोकादायक ठरू शकतं. मेलबर्न विद्यापिठाच्या अहवालानुसार, मधमाशीचं विष हे प्रथिने आणि रसायनांचं एक शक्तिशाली मिश्रण आहे. ज्यामुळे काही लोकांमध्ये गंभीर ॲलर्जीक प्रतिक्रिया दिसू शकतात. जर चावा श्वासनलिकेला घेतला असेल तर सूज येऊन श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि हृदयावरील ताण वाढू शकतो.

अशा परिस्थितीत नेमकं काय करावं?

मधमाशी चावल्यास त्वरित उपाय करणं आवश्यक आहे. विषाचा परिणाम कमी करण्यासाठी 30 सेकंदांच्या आत डंख काढून टाकावा. जर डंख घशात असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल, चक्कर येणं किंवा तीव्र सूज येणं अशी लक्षणे दिसली तर ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.